TRENDING:

Milk : दूध पिण्याचे गंभीर दुष्परिणाम; या 6 लोकांनी तर बिलकुल पिऊ नये

Last Updated:
Milk Side Effects : दररोज एक ग्लास दूध पिणं आरोग्यासाठी चांगले मानलं जातं. पण दूध प्रत्येकासाठी चांगलं असं नाही. काही लोकांना दूध प्यायल्यास गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.
advertisement
1/9
Milk : दूध पिण्याचे गंभीर दुष्परिणाम; या 6 लोकांनी तर बिलकुल पिऊ नये
दररोज एक ग्लास दूध पिणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. दुधातील प्रथिने, पोषक तत्वे आणि खनिजे मुलांच्या वाढीसाठी आणि प्रौढांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असतात. दूध हे कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी सारख्या महत्त्वाच्या पोषक घटकांचा स्रोत आहेत. पण दूध प्रत्येकासाठी योग्य असू शकत नाही. काही आरोग्य समस्या असलेल्या लोकांना दूध प्यायल्यास गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.
advertisement
2/9
काही अभ्यासात असं म्हटलं आहे की दुधामुळे हृदयरोग, टाइप 2 डायबेटिज आणि काही प्रकारचे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. पण काही अभ्यासात असा इशारा देण्यात आला आहे की जास्त प्रमाणात दुधाचं सेवन केल्याने पिंपल्स, प्रोस्टेट कर्करोग आणि अशक्तपणासारख्या समस्या उद्भवू शकतात. विशेषतः 6 प्रकारच्या समस्या असलेल्या लोकांनी दूध अजिबात पिऊ नये. या यादीत कोण आहे पाहुयात.
advertisement
3/9
हृदयरोग आणि कोलेस्टेरॉल ग्रस्त : फुल क्रीम दुधात सॅच्युरेटेड फॅट असतं. हे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल वाढवतं, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हृदयरोग असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात कमी चरबीयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करावा.
advertisement
4/9
लॅक्टोज इन्टोलेरन्स : जर तुम्हाला दूध प्यायल्यानंतर पोटफुगी, गॅस आणि जुलाब यासारख्या समस्या येत असतील तर याचा अर्थ तुम्ही लॅक्टोज इन्टोलेरन्स आहात. या लोकांनी लॅक्टोज फ्री दूध किंवा बदाम आणि सोयासारखं वनस्पती-आधारित दूध पिणं चांगलं.
advertisement
5/9
कर्करोगाचा धोका असलेले लोक : काही संशोधनातून असे दिसून आलं आहे की जास्त दूध प्यायल्याने पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. जर कुटुंबातील कोणालाही कर्करोग असेल तर कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांच्या आहारात दूध समाविष्ट करावं.
advertisement
6/9
कमी रोगप्रतिकारक शक्ती : कच्च्या दुधात साल्मोनेला आणि ई. कोलायसारखे हानिकारक बॅक्टेरिया असतात. गर्भवती महिला, वृद्ध आणि कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक कच्चं दूध प्यायल्यास ते त्यांच्यासाठी जीवघेणं ठरू शकतं. त्यांनी फक्त पाश्चराइज्ड किंवा चांगलं उकळलेलं दूध प्यावं.
advertisement
7/9
मिल्क प्रोटिनजी ऍलर्जी : आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती दुधातील प्रथिनांवर नकारात्मक प्रतिक्रिया देते. जर दूध प्यायल्यानंतर पुरळ, सूज आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा लोकांनी दूध अजिबात पिऊ नये.
advertisement
8/9
अशक्त मुले : जर मुलांना जास्त दूध दिलं गेलं तर ते लोहयुक्त इतर पदार्थ योग्यरित्या खाऊ शकणार नाहीत. यामुळे मुलांमध्ये लोहाची कमतरता आणि अशक्तपणा होऊ शकतो. मुलांना दुधासोबत संतुलित आहार द्यावा.
advertisement
9/9
इतर लोक : खूप पिंपल्स असतील तर जास्त दूध पिऊ नये. दुधातील काही हार्मोन्स आणि वाढीचे घटक शरीरात इन्सुलिनची पातळी वाढवतात आणि सेबम उत्पादन वाढवतात. संशोधनात असं दिसून आलं आहे की यामुळे पिंपल्स आणखी वाढू शकतात.  पचनाच्या समस्या असलेल्या लोकांना दूध पचवण्यास त्रास होऊ शकतो, ज्यामुळे समस्या आणखी वाढू शकते. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Milk : दूध पिण्याचे गंभीर दुष्परिणाम; या 6 लोकांनी तर बिलकुल पिऊ नये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल