Diwali Decor Tips : दिवाळीची सजावट करताना 'या' चुका टाळा! बिघडवतील घराचे सौंदर्य आणि तुमचा मूडही..
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Diwali Decoration Mistakes : दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, आकर्षक रंगसंगती आणि उत्साहाचे वातावरण. आपल्या घराला सुंदर आणि आकर्षक बनवण्यासाठी लोक खूप मेहनत घेतात, पण उत्साहाच्या भरात काही चुका होतात, ज्यामुळे घराचा 'एस्थेटिक' लूक बिघडतो. चला तर मग जाणून घेऊया, या दिवाळीला तुमचा घराला एक 'क्लासी' आणि संतुलित लूक देण्यासाठी सजावटीच्या वेळी कोणत्या चुका टाळाव्या आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
advertisement
1/5

सजावटीच्या वस्तूंचा अतिवापर : अनेकदा लोक घरात रोषणाई, रांगोळी, मेणबत्त्या आणि झालरी यांचा वापर करतात. पण उत्साहाच्या भरात या सर्व वस्तू घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक भिंतीवर आणि प्रत्येक मोकळ्या जागेवर लावतात. यामुळे घर खूप भरलेले आणि गोंधळलेले दिसते. या दिवाळीत ही चूक करू नका. मोजक्या आणि चांगल्या वस्तूंचा वापर करा आणि मोकळी जागा सोडा, ज्यामुळे सजावट आकर्षक आणि संतुलित दिसेल.
advertisement
2/5
रंगांचे चुकीचे कॉम्बिनेशन : दिवाळीत घर प्रकाशित करण्यासाठी अनेक रंगांच्या लाईट्स लावल्या जातात. पण काही लोक घरात जास्त रंगीबेरंगी लाईट्स लावतात, ज्यामुळे सजावटीची थीम पूर्णपणे खराब होते. दिवाळीसाठी नेहमी एकाच रंगाच्या लाईट्सची किंवा पेस्टल कलरच्या शेड्सची निवड करा. जर तुम्ही दोन रंगांचे कॉम्बिनेशन ठेवले, तर तुमच्या घराला एक एस्थेटिक लूक मिळेल.
advertisement
3/5
मेणबत्ती आणि दिवे चुकीच्या जागी ठेवणे : मेणबत्ती आणि दिवे घराची शोभा वाढवतात. पण चुकीच्या जागी ठेवल्यास ते घराचा संपूर्ण लूक बिघडवू शकतात. काही लोक घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, खिडकीत, भिंतीवर, बाल्कनीत आणि मुख्य दरवाजावर दिवे आणि मेणबत्त्या लावतात. हे अति वाटू लागते. यामुळे पडदे आणि लाकडी वस्तूंना आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे मोकळी जागा सोडून दिवे ठेवा आणि शक्य असल्यास दिव्यांचे स्टँड वापरा.
advertisement
4/5
सजावटीच्या वस्तू चुकीच्या पद्धतीने ठेवणे : घर सजवण्यासाठी मेणबत्ती, दिवे, झालरी आणि शोभेच्या वस्तू वापरल्या जातात. पण ते योग्य जागी न ठेवल्यास घर अस्तव्यस्त दिसते. काही लोक विचार न करता वस्तू कुठेही टांगून ठेवतात. ही चूक तुम्ही अजिबात करू नका. मोकळी जागा पाहून, रंगसंगतीचा विचार करून आणि वस्तूंचा समूह करूनच घर सजवा. योग्य ठिकाणी ठेवल्यामुळे सजावट उठून दिसते.
advertisement
5/5
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diwali Decor Tips : दिवाळीची सजावट करताना 'या' चुका टाळा! बिघडवतील घराचे सौंदर्य आणि तुमचा मूडही..