'बॅचलर्स बिर्याणी'चा बोलबाला; टॅगलाईन तर लय भारी, चवपण मस्त आणि स्वस्त!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
'या' हटके टॅगलाईनमागचा अर्थ हा केवळ जास्तीत जास्त लोकांनी इथली बिर्याणी खावी आणि व्यवसाय जास्तीत जास्त विस्तारावा, एवढाच आहे. म्हणजेच व्यवसाय कसा करावा, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.
advertisement
1/5

'तुम्ही बिर्याणी खा, आम्ही लग्न करतो', या टॅगलाईनवर चार मित्रांनी 'बॅचलर्स बिर्याणी' व्यवसाय सुरू केला. कौशिक मंडल, बिस्वजित करमरकर, दीप आचार्य आणि संदीप करमरकर अशी या चौघांची नावं.
advertisement
2/5
पश्चिम बंगालच्या बंकूरा भागातील शुशुनिया हिल्समध्ये त्यांचा हा व्यवसाय जोमात सुरू आहे. या भागात बिर्याणी फार ठिकाणी मिळायची नाही, हीच सुवर्णसंधी साधून त्यांनी व्यवसाय सुरू केला.
advertisement
3/5
'बॅचलर्स बिर्याणी'मध्ये केवळ 100 रुपयांना पोटभर चिकन बिर्याणी मिळते. त्याचबरोबर चिकनचे विविध पदार्थही इथं उपलब्ध असतात. तसंच वेगवेगळे थाळी मेन्यूदेखील इथं चाखायला मिळतात.
advertisement
4/5
खरंतर या बिर्याणीच्या दुकानाचं नाव आणि टॅगलाईन ऐकूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत, अविवाहितांपासून विवाहितांपर्यंत सर्वजण इथं हजेरी लावतात. अनेकजण तर सोशल मीडियावरून या दुकानाबाबत माहिती मिळवून इथं येतात. शिवाय 100 रुपयांत इथं उत्कृष्ट बिर्याणी मिळते, असं ग्राहक सांगतात.
advertisement
5/5
शुशुनिया हिल्सवर येणाऱ्या पर्यटकांसाठी ही बिर्याणी म्हणजे एक पर्वणीच असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
'बॅचलर्स बिर्याणी'चा बोलबाला; टॅगलाईन तर लय भारी, चवपण मस्त आणि स्वस्त!