TRENDING:

Induction Use : इंडक्शन वापरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या! नाहीतर स्वयंपाक करता करताच पडेल बंद..

Last Updated:
Induction Using Tips : आता इंडक्शनचा वापर वाढला आहे. त्याचा वापर तसा सुरक्षित आहे आणि इंडक्शनला खर्चही कमी येतो. पण तुम्ही इंडक्शन वापरण्याचा विचार करत असाल तर किंवा नवीन वापरत असाल, तर तो वापरताना काही गोष्टीची काळजी घ्या.
advertisement
1/9
इंडक्शन वापरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या! नाहीतर स्वयंपाक करता करताच पडेल बंद..
इंडक्शन वापरताना काही सध्या चुका करणं टाळा. त्याचा योग्य पद्धतीनं वापर केल्यास इंडक्शन खूप जास्त काळ तुमची साथ देऊ शकते. मात्र चुकीच्या पद्धतीनं वापरल्यास इंडक्शनचं नुकसान होऊ शकतं आणि तुमचा स्वयंपाक मधेच थांबू शकतो.
advertisement
2/9
सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडक्शनचा हेव्ही वापर केल्यानंतर ते लगेच बंद करू नका. ही चूक बरेच लोक करतात. वाटतं याचा वापर संपलाय तर वीज फुकट का घालवावी म्हणून ते लगेच इंडक्शन बंद करतात. पण हे चुकीचं आहे. कारण स्वयंपाक केल्यानंतर स्टोव्ह खूप गरम असतो.
advertisement
3/9
गरम इंडक्शनमधले आतले भाग थंड होण्यासाठी थोडा वेळ लागतो. लगेच बंद केल्याने आतली उष्णता बाहेर पडू शकत नाही. यामुळं स्टोव्ह लवकर खराब होऊ शकतो. म्हणून स्वयंपाकानंतर काही मिनिटं इंडक्शन सुरु ठेवा आणि मग बंद करा.
advertisement
4/9
इंडक्शन वापरल्यानंतर लगेच प्लग काढू नका. कारण स्वयंपाक केल्यानंतरही इंडक्शनमधला पंखा काही काळ चालतो. हा पंखा उष्णता बाहेर काढण्याचं काम करतो. लगेच प्लग काढल्यामुळे ही कूलिंग प्रक्रिया मध्येच थांबते आणि याचा परिणाम इंडक्शनच्या यंत्रावर होतो.
advertisement
5/9
प्लग लगेच काढल्याने इंडक्शनची कार्यक्षमता आणि आयुष्य कमी होतं. म्हणून स्वयंपाक केल्यानंतर थोडा वेळ थांबून वाट पाहा. जेव्हा पंखा आपोआप बंद होईल, तेव्हा प्लग काढा. यामुळे इंडक्शनचं आयुष्य वाढतं आणि तो जास्त काळ टिकतो.
advertisement
6/9
इंडक्शनची स्वछता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तास स्वयंपाक झाल्यावर पण इंडक्शन रोज कापडाने का होईना स्वच्छ केलाच पाहिजे. पण त्याचसोबत इंडक्शनच्या काही जागा आवर्जून साफ कारण आवश्यक असतं. इंडक्शनच्या बाजूला आणि तळाशी लहान कट्स असतात. या भागातून उष्णता बाहेर पडते. या जागेवर धूळ किंवा घाण साचली असेल तर ती त्वरित स्वच्छ करा.
advertisement
7/9
गरम हवा बाहेर पडण्याची जागा धुळीने बंद झाली तर हवेचा प्रवाह थांबतो. यामुळे स्टोव्ह खूप गरम होतो आणिकाळानंतरने त्याकडे अनेक प्रॉब्लेम्स यायला लागतात. म्हून तो योग्य पद्धतीने व्यवस्थित साफ करा.
advertisement
8/9
तसेच इंडक्शन ओट्यावर अशा जागी ठेवा जिथे हवा व्यवस्थित पोहोचते. मोकळ्या आणि स्वच्छ जागी इंडक्शन ठेवल्यास त्याची कूलिंग सिस्टम चांगली राहते आणि व्यवस्थित काम करते.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Induction Use : इंडक्शन वापरताना 'या' गोष्टींची काळजी घ्या! नाहीतर स्वयंपाक करता करताच पडेल बंद..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल