थरथरते हात अन् द्राक्षांचा चिखल, गारपिटीनं होतं नव्हतं जमीनदोस्त केलं, ढसाढसा रडला शेतकरी!
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सांगलीतील भिवघाट परिसरात गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब आणि केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. विठ्ठल कापसे यांच्या द्राक्षबागेचे नुकसान पाहून शेतकऱ्यांची व्यथा वाढली आहे.
advertisement
1/6

सांगली, आसिफ मुरसल : शेतकऱ्याच्या घामाचा सुगंध ज्या द्राक्षाच्या बागांमधून दरवळत होता, तिथे आज फक्त सडलेल्या द्राक्षांचा खच आणि बळीराजाच्या डोळ्यांतील पाणी पाहायला मिळत आहे. सांगली जिल्ह्यातील भिवघाट आणि परिसरातील गावांना काल सायंकाळी निसर्गाच्या अशा काही भीषण कोपाचा सामना करावा लागला, ज्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत अवघ्या दीड तासात मातीमोल केली.
advertisement
2/6
भिवघाट परिसरात काल सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि बघता बघता तब्बल दीड तास गारांचा पाऊस सुरू झाला. ही गारपीट इतकी प्रचंड होती की, हाताशी आलेली द्राक्षं, डाळिंब आणि केळीच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या.
advertisement
3/6
विशेषतः ज्या बागांमधील द्राक्षं दोनच दिवसांत परदेशात निर्यात होणार होती, त्या बागांवर गारांचा असा तडाखा बसला की द्राक्षाचे मणी जागच्या जागी फुटले आहेत. फुटलेले हे मणी आता बागेतच कुजू लागल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
4/6
विठ्ठल कापसे यांच्या डोळ्यांदेखत बाग कोलमडली. भिवघाटमधील शेतकरी विठ्ठल कापसे यांची व्यथा तर अंगावर काटा आणणारी आहे. त्यांची द्राक्षबाग एका बाजूने पूर्णपणे कोलमडून पडली आहे. ज्या बागेला मुलाप्रमाणे वाढवलं, ती बाग डोळ्यांदेखत जमिनीवर लोळताना पाहण्याचं दुर्दैव त्यांच्या नशिबी आलं.
advertisement
5/6
गारांच्या माऱ्यामुळे द्राक्षाचे घड फुटून आता सडू लागले आहेत. लाखो रुपयांचे कर्ज काढून उभी केलेली ही स्वप्नं आता मातीत मिसळली आहेत. समोर आलेल्या फोटोंमध्ये द्राक्ष बागेची झालेली दुरवस्था पाहून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल.
advertisement
6/6
सांगलीचा हा पट्टा द्राक्ष उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र, कालच्या दीड तासाच्या पावसाने निसर्गाचं क्रूर रूप दाखवून दिलं. केवळ द्राक्षच नव्हे, तर डाळिंब आणि केळीच्या पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. बँकांचं कर्ज कसं फेडायचं आणि पुढच्या हंगामाचं काय करायचं, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
थरथरते हात अन् द्राक्षांचा चिखल, गारपिटीनं होतं नव्हतं जमीनदोस्त केलं, ढसाढसा रडला शेतकरी!