TRENDING:

डेब्यू फिल्म अन् रातोरात फेमस झाली SRK ची हिरोईन, लग्न होताच बॉलिवूडला रामराम, आज 45,000 कोटींची मालकीण

Last Updated:
बॉलिवूडची ती सौंदर्यवती, जिने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत फक्त एकाच चित्रपटात काम केले, तरीही त्या एका चित्रपटाने प्रेक्षकांवर असा प्रभाव पाडला की लोक तिला आजही विसरलेले नाहीत. या सुंदर बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या पहिल्या चित्रपटानंतर इंडस्ट्रीतून निवृत्ती घेतली. ती ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर आहे, पण आजही तिचे आयुष्य लॅविश आयुष्य जगतेय. 
advertisement
1/8
डेब्यू फिल्म अन् रातोरात फेमस झाली SRK ची हिरोईन, लग्न होताच बॉलिवूडला रामराम, आज 45,000 कोटींची मालकीण
बॉलिवूडमध्ये एक चित्रपटसुद्धा कोणाचेही नशीब बदलू शकतो. अनेक जण वर्षानुवर्षे संघर्ष करतात पण चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना त्यांनी पाहिलेले स्टारडमचे स्वप्न त्यांना अजूनही पूर्ण करता येत नाही. दुसरीकडे, या इंडस्ट्रीमध्ये अशा काही स्टार्सच्या कथा आहेत जिथे एकाच चित्रपटाने त्यांचे नशीब बदलले.
advertisement
2/8
बॉलिवूडची ती अभिनेत्री, जिने केवळ एका चित्रपटाने ओळख मिळवली, इंडस्ट्री सोडली आणि नंतर 45,000 कोटी रुपयांचे व्यावसायिक साम्राज्य उभे केले. पडद्यावरून थेट व्यावसायिक वर्तुळापर्यंतचा हा प्रवास कोणत्या स्टारने केला असेल, याचा तुम्ही अंदाज लावू शकता का? नसेल, तर चला जाणून घेऊया.
advertisement
3/8
आज आपण ज्या सौंदर्यवतीबद्दल बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे गायत्री जोशी. जिने शाहरुख खानसोबत काम केले आहे. 2004 साली प्रदर्शित झालेल्या 'स्वदेस' या चित्रपटात ती शाहरुख खानसोबत दिसली.  चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 
advertisement
4/8
तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि 200 साली 'फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल' हा किताब जिंकला.  2004  साली प्रदर्शित झालेल्या 'स्वदेस' या चित्रपटात शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर केली.
advertisement
5/8
गायत्रीने केवळ एकाच चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. असे असूनही तिने चित्रपटसृष्टीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. 'स्वदेस' व्यतिरिक्त, ती तिच्या कॅडबरीच्या जाहिरातींसाठीही ओळखली जाते. आपल्या पहिल्या चित्रपटानंतर गायत्री जोशीने रुपेरी पडदा कायमचा सोडला.
advertisement
6/8
गायत्री जोशीचा जन्म 1977 साली महाराष्ट्रातील नागपूर येथे एका मराठी जोशी कुटुंबात झाला. ती रामनिवास रुंडाला आणि हेमा मिलानी यांच्या कन्या असून त्यांना अहाना जोशी नावाची एक बहीण आहे. गायत्रीने आपल्या करिअरची सुरुवात व्हिडिओ जॉकी म्हणून केली आणि मॉडेलिंगमध्येही नाव कमावले. ज्यात कॅडबरी पर्कच्या एका प्रतिष्ठित जाहिरातीचा समावेश आहे. 'स्वदेस' प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या एका वर्षानंतर 2005 मध्ये या अभिनेत्रीने लग्न करून संसार थाटला.
advertisement
7/8
गायत्रीने भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या ओबेरॉय रियल्टीचे प्रमुख, उद्योगपती विकास ओबेरॉय यांच्याशी विवाह केला. त्यांना विहान आणि युवा ही दोन मुले आहेत. लग्नानंतर गायत्रीने स्वतःला पूर्णपणे कुटुंबासाठी वाहून घेतले आणि मुलांवर व घराकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या.
advertisement
8/8
विकास ओबेरॉय यांनी व्यवसायात प्रचंड यश मिळवले असून, मुंबईतील वेस्टिन हॉटेलसह अनेक मोठे प्रकल्प यशस्वीपणे सांभाळले आहेत. गायत्री जोशी आणि विकास ओबेरॉय यांची एकूण संपत्ती 45,000  कोटी रुपये आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
डेब्यू फिल्म अन् रातोरात फेमस झाली SRK ची हिरोईन, लग्न होताच बॉलिवूडला रामराम, आज 45,000 कोटींची मालकीण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल