आठवड्यातून एकदातरी खाता पण तूरडाळीचे नेमके फायदे माहितीयेत का? पोटासाठी असते उत्तर
- Published by:Pooja Pawar
- trending desk
Last Updated:
जेवणात अनेकजण तूरडाळीचे सेवन करतात. परंतु अनेकांना तिच्या सेवनाने आरोग्याला कोणते फायदे मिळतात याविषयी ठाऊक नसते. तेव्हा याविषयी विस्तृत माहिती जाणून घेऊयात.
advertisement
1/7

डाळींचे विविध प्रकार असतात. त्यातही तूरडाळ दररोज खाणाऱ्यांचे प्रमाण हे मोठे आहे. अनेकांना तर दिवसातून एकदा तरी तूरडाळ खाण्यासाठी लागते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर दाल तडका किंवा दाल फ्राय घेतली जाते. यामध्येही तूरडाळ वापरण्यात येते. पण तुम्हाला माहिती आहे का, ही डाळ खाण्याचे फायदेही अनेक आहेत.
advertisement
2/7
तूरडाळ ही जवळपास सर्वच जणांना आवडते. काही लोकांना ही डाळ इतकी आवडते की ते दररोज खाऊ शकतात. ही डाळ अनेक पोषकतत्त्वांनी समृद्ध असते. अनेक जण या डाळीला पिवळी डाळ असेही म्हणतात. चला तर, तूरडाळ खाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊ.
advertisement
3/7
पचनसंस्था उत्तम राहते : तूरडाळीत प्रथिनांबरोबरच फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरचे प्रमाण चांगले असल्याने ही डाळ पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे तूरडाळ ही आरोग्यासाठी उत्तम समजली जाते.
advertisement
4/7
गरोदरपणात उपयुक्त : गरोदरपणात महिलांना सर्व पोषकतत्त्वांची गरज असते. यासोबतच त्यांना हलकं आणि पचायला सोपं असं अन्न हवं असतं. अशावेळी तूरडाळ हा चांगला पर्याय आहे. यामध्ये फॉलिक अॅसिडव्यतिरिक्त कार्बोहायड्रेट्सदेखील असतात. त्याचबरोबर फॉलिक अॅसिडमुळे अॅसिडिटीच्या समस्येपासूनही बचाव होतो.
advertisement
5/7
पोषकतत्त्वांनी समृद्ध : तूरडाळ अनेक पोषकतत्त्वांनी समृद्ध असते. या डाळीत लोह, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉलिक अॅसिड, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. त्याचबरोबर मॅंगनीज, झिंक, कॉपर, सेलेनियम यांसारखे घटकही यात आढळतात, ज्याच्या मदतीनं पचनसंस्था योग्य राहण्यास मदत होते. तसेच शरीराला ऊर्जा मिळते.
advertisement
6/7
मुबलक प्रथिने : तूरडाळीत प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर ही डाळ प्रत्येक ऋतूत खाता येते. तूरडाळ सकाळ-संध्याकाळ कधीही खाऊ शकतात. बारा महिने तूरडाळ खाता येत असल्याने व ती कोणत्याही वेळी खाल्ली, तरी तिचे साईड इफेक्ट होत नसल्यामुळे ती खाण्यास अनेकांची पसंती असते.
advertisement
7/7
दरम्यान, प्रत्येक ऋतूमध्ये योग्य आहाराला खूप महत्त्व असते. योग्य आहार हा चांगले आरोग्य राहण्यासाठी गरजेचा असतो. योग्य आहारात डाळीचा ही समावेश होतो. त्यातही तूरडाळ ही पचनसंस्थेसाठी उत्तम असल्याने ती खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या तूरडाळीची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याने ती सहज उपलब्ध होते. आरोग्यासाठी उपयुक्त व फायदेशीर असणाऱ्या या डाळीचे उत्पादन ही मुबलक प्रमाणात भारतामध्ये घेतले जात असल्याने बारा महिने ती उपलब्ध होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
आठवड्यातून एकदातरी खाता पण तूरडाळीचे नेमके फायदे माहितीयेत का? पोटासाठी असते उत्तर