Chef Kitchen Tips : भात करपला तर त्यातून वास कसा घालवायचा? शेफ पंकजने दिली खास टिप्स
- Published by:Priya Lad
Last Updated:
How To Removed Smell From Burn Rice : भात थोडा जरी खाली करपला तरी वरपर्यंत सगळ्या भाताला वास येतो आणि मग तो भात खाण्यासाठी नकोसा वाटतो.
advertisement
1/5

भात, पुलाव, बिर्याणी बनवताना काही वेळा ती खाली लागते किंवा करपते. मग त्या संपूर्ण भाताला करपल्याचा वास येतो. त्याची चवच निघून जाते. काही जण तर मग संपूर्ण भातच फेकून देतात. पण आता भातातील करपल्याचा वास घालवण्याची ट्रिक आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
advertisement
2/5
भात करपल्याचा वास आला की लगेच गॅस बंद करा. भांड्यावरील झाकण काढा. आता एक कांदा घ्या. कांदा सोलायचा नाही. सालीसकट त्याचे 4 तुकडे करा.
advertisement
3/5
आता भांड्यात असलेल्या भातात 4 बाजूंनी हे कांद्याचे 4 तुकडे टाका. भाताच्या आतमध्ये टाकून ठेवा. आता त्यावर झाकण ठेवून 10-15 मिनिटं ठेवा.
advertisement
4/5
भातावरील झाकण काढा, त्यात टाकलेले कांदे बाजूला ठेवा. आता तुम्ही पाहाल की भाताला करपल्याचा वास बिलकुल येणार नाही. हा सगळा वास कांद्याने शोषून घेतला.
advertisement
5/5
आता खालचा भात करपलेला आहे. त्यामुळे फक्त वरवरचा भात दुसऱ्या भांड्यात काढून घ्या. कुणाला कळणारही नाही की भात करपला होता. (सर्व फोटो : सोशल मीडिया व्हिडीओ ग्रॅब)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Chef Kitchen Tips : भात करपला तर त्यातून वास कसा घालवायचा? शेफ पंकजने दिली खास टिप्स