Cloves Benefits : रिकाम्या पोटी लवंग चघळण्याचे हे फायदे माहित आहे? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बेस्ट
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले असतात, ज्यात औषधी गुणधर्म असतात. त्यापैकी एक म्हणजे लवंग. लवंग आकाराने खूप लहान असते पण तिचे फायदे तितकेच मोठे आहेत. लवंगात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्यामुळे काही लक्ष न चुकता रोज एक तरी लवंग खातात. चला पाहूया रोज लवंग खाण्याचे फायदे.
advertisement
1/8

लवंगांमध्ये जीवनसत्त्वे, फायबर, प्रथिने, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, मँगनीज, कार्बोहायड्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. लवंग अनेक प्रकारच्या आजारांवरही खूप फायदेशीर आहे.
advertisement
2/8
रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्या लवकर दूर होतात. जर तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल तर लवंगाचा थोडासा वापरही तुम्हाला खूप फायदे देऊ शकतो. चला जाणून घेऊया सकाळी रिकाम्या पोटी लवंगा चघळल्याने आपल्याला आणखी कोणते आरोग्य फायदे होतात.
advertisement
3/8
यकृत निरोगी ठेवते : यकृत म्हणजेच लिव्हर हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. कारण हे यकृत शरीरातील टाकाऊ घटक काढून टाकते आणि इतर अनेक कार्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. लवंगाचे नियमित सेवन केल्यास यकृत निरोगी राहते.
advertisement
4/8
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहणे महत्त्वाचे आहे. लवंगामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते आणि ते अँटीऑक्सिडंट्सने देखील भरपूर असते. लवंग रिकाम्या पोटी खाल्ल्यास पांढऱ्या रक्त पेशी वाढण्यास मदत होते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
advertisement
5/8
दातदुखी आणि डोकेदुखीपासून आराम : तुमचे दात दुखत असतील तर लवंग वापरा. लवंगामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात, जे दातदुखीपासून त्वरित आराम देतात. इतकंच नाही तर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर लवंगाच्या तेलाच्या सुवासाने वेदनांपासून आराम मिळतो. हिरड्यांना संसर्ग झाला असेल तर तुम्ही त्यासोबत माउथवॉश देखील वापरू शकता.
advertisement
6/8
श्वासाची दुर्गंधी दूर करते : लवंग केवळ दातदुखीपासून आराम देत नाही तर श्वासाची दुर्गंधी देखील दूर करते. श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लोक विविध प्रकारची उत्पादने वापरतात. परंतु, तुम्ही लवंगाने श्वासाची दुर्गंधी नैसर्गिकरित्या दूर करू शकता. लवंगमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. सकाळी रिकाम्या पोटी लवंग चघळल्यास ते तोंडातील जंतू पूर्णपणे काढून टाकते.
advertisement
7/8
लवंग हाडे मजबूत करते : हे आपल्या हाडांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. जर तुमची हाडे कमकुवत असतील तर तुम्ही सकाळी उठून दोन लवंगा चघळाव्या. लवंगातही भरपूर प्रमाणात मँगनीज असते, ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
advertisement
8/8
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cloves Benefits : रिकाम्या पोटी लवंग चघळण्याचे हे फायदे माहित आहे? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बेस्ट