Cow Vs Buffalo Ghee : गायीचं तूप की म्हशीचं तूप? आरोग्यासाठी कोणतं जास्त फायदेशीर आहे? तज्ञ काय सांगतात
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कोणी म्हणतं गाईचं तूप औषधी आहे, तर कोणाला म्हैशीचं तूप ताकदवर वाटतं. आज आपण या दोन्हीमधील फरक, त्यांचे फायदे आणि तुमच्या शरीरासाठी नक्की कोणतं तूप 'बेस्ट' आहे, हे सविस्तर आणि शास्त्रोक्त पद्धतीने जाणून घेऊया.
advertisement
1/10

आपल्या भारतीय स्वयंपाकघरात 'तूप' हा केवळ एक पदार्थ नसून ते एक संस्कार आहे. गरम वरण-भातावर तुपाची धार असल्याशिवाय जेवणाला पूर्णत्व येत नाही. लहान मुलांच्या हाडांच्या मजबुतीपासून ते वृद्धांच्या सांधेदुखीपर्यंत, तूप नेहमीच रामबाण उपाय मानलं गेलं आहे. पण जेव्हा आपण तूप विकत घ्यायला जातो किंवा घरी बनवतो, तेव्हा एक मोठा प्रश्न नेहमी समोर उभा राहोत, तो म्हणजे, "कोणाचं तुप जास्त चांगलं म्हशीचं की गाईचं?"
advertisement
2/10
कोणी म्हणतं गाईचं तूप औषधी आहे, तर कोणाला म्हैशीचं तूप ताकदवर वाटतं. आज आपण या दोन्हीमधील फरक, त्यांचे फायदे आणि तुमच्या शरीरासाठी नक्की कोणतं तूप 'बेस्ट' आहे, हे सविस्तर आणि शास्त्रोक्त पद्धतीने जाणून घेऊया.
advertisement
3/10
आरोग्यासाठी कोणतं आहे सर्वात शक्तिशाली?तूप हे फॅट्सचा उत्तम स्रोत आहे, पण गाईच्या आणि म्हैशीच्या दुधातील गुणधर्मांनुसार त्यांच्यापासून बनणाऱ्या तुपाचे परिणामही वेगळे असतात.
advertisement
4/10
1. गाईचे तूप (Cow Ghee): गाईचं तूप हे हलकं पिवळसर असतं. आयुर्वेदात याला 'अमृत' मानलं गेलं आहे. हे पचनास हलके असते. गाईच्या तुपात शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स असतात, ज्यामुळे ते पचायला खूप सोपं असतं. ज्यांना पचनाचे त्रास आहेत, त्यांच्यासाठी हे वरदान आहे. यामध्ये व्हिटॅमिन A, D, E आणि K भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात 'बीटा-कॅरोटीन' असतं, ज्यामुळे त्याला पिवळा रंग मिळतो.
advertisement
5/10
आयुर्वेदानुसार, गाईचं तूप स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूच्या विकासासाठी उत्तम आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर गाईचं तूप जास्त फायदेशीर ठरतं कारण ते शरीरातील मेटाबॉलिजम वाढवतं.
advertisement
6/10
2. म्हैशीचे तूप (Buffalo Ghee): शक्तीचा स्रोतम्हैशीचं तूप हे पांढरं शुभ्र आणि दाणेदार असतं. ज्यांना शारीरिक कष्टाची कामे करायची आहेत, त्यांच्यासाठी हे उत्तम मानलं जातं. म्हैशीच्या तुपात फॅट्सचं प्रमाण गाईच्या तुपापेक्षा जास्त असतं. यामुळे यातून शरीराला जास्त ऊर्जा (Energy) मिळते.
advertisement
7/10
यात फॉस्फरस आणि कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असतं, जे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. जे लोक खूप बारीक आहेत किंवा ज्यांना वजन वाढवायचं आहे, त्यांच्यासाठी म्हैशीचं तूप हा एक चांगला पर्याय आहे. म्हैशीच्या तुपात ओलावा कमी असल्याने ते गाईच्या तुपापेक्षा जास्त काळ टिकू शकतं.
advertisement
8/10
कोणतं तूप निवडावं?1. लहान मुले आणि वृद्ध: यांच्यासाठी गाईचं तूप सर्वोत्तम आहे, कारण त्यांची पचनशक्ती नाजूक असते2. शारीरिक मेहनत करणारे: जर तुम्ही जिम लावलेली असेल किंवा शेतात कष्टाचे काम करत असाल, तर म्हैशीचे तूप तुम्हाला जास्त ताकद देईल.3. हृदयरोग किंवा लठ्ठपणा: अशा लोकांनी गाईच्या तुपाचा वापर मर्यादित प्रमाणात करावा, म्हैशीचं तूप टाळलेलं बरं.4. झोपेच्या तक्रारी: रात्री झोपताना कोमट दुधात गाईचं तूप टाकून प्यायल्याने चांगली झोप लागते.
advertisement
9/10
ताकदीच्या बाबतीत म्हैशीचं तूप वरचढ असलं, तरी आरोग्याच्या आणि औषधी गुणधर्मांच्या बाबतीत 'गाईचं तूप' हे जगात सर्वोत्तम मानलं जातं. तुमच्या जीवनशैलीनुसार तुम्ही योग्य तुपाची निवड करू शकता.
advertisement
10/10
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cow Vs Buffalo Ghee : गायीचं तूप की म्हशीचं तूप? आरोग्यासाठी कोणतं जास्त फायदेशीर आहे? तज्ञ काय सांगतात