Diabetes Control Tips : डायबिटीजच्या रुग्णांनी 'या' वेळी करा एक्सरसाइज, लवकर कमी होईल शुगर, एकदा ट्राय करून बघाच
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
भारतात सुमारे १० कोटी डायबिटीजचे रुग्ण असून केवळ वृद्धच नाही तर तरुण लोक सुद्धा याने त्रस्त आहेत. डायबिटीज हा एक असा आजार आहे ज्यामुळे इतर आजारांना सुद्धा आमंत्रण मिळते. डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी रुग्ण विविध उपाय करत असतात. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार जर त्यांनी शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर व्यायामासंदर्भात काही नियमांचे पालन करायला हवे.
advertisement
1/6

दिल्ली मेडिकल असोसिएशनचे पूर्व प्रेसिडेंट आणि सीनियर फिजीशियन डॉ. अनिल बंसल यांनी News18 शी बोलताना सांगितले की डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी लोकांनी चांगली लाइफस्टाइल, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाचा अवलंब करायला हवा. या सर्व गोष्टींमुळे डायबिटीज कंट्रोल करण्यास मदत होते. तसेच रुग्णांनी दररोज वेळेवर व्यायाम करण्यासोबतच औषध सुद्धा घ्यायला हवीत.
advertisement
2/6
डॉक्टरांचं म्हणणं आहे की डायबिटीज रुग्णांनी दररोज सकाळ आणि संध्याकाळी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम करणं म्हणजे वर्क आउट करणेच नाही तर चालणे हा सुद्धा व्यायाम आहे. सकाळ संध्याकाळ चालण्याचा व्यायाम केल्याने शुगर लेव्हलवर पॉझिटिव्ह परिणाम दिसून येतो.
advertisement
3/6
डायबिटीजच्या रुग्णांनी दुपारी आणि रात्री जेवल्यावर व्यायाम करायला हवा. दुपारच्या जेवणानंतर शक्य नसले तर तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा चालणे किंवा व्यायाम करू शकता. जेवल्यावर अनेकदा ब्लड शुगर वाढते तेव्हा तुम्ही एक्सरसाइज करून ती कंट्रोलमध्ये आणू शकता.
advertisement
4/6
डायबिटीजच्या रुग्णांनी कोणत्या वेळी व्यायाम करायला हवा? याच उत्तर देताना डॉ. अनिल बंसल यांनी सांगितले की, डायबिटीज रुग्णांनी जेवल्यावर चालण्याचा व्यायाम नक्की करावा. साधारणपणे जेवल्यावर चालण्याचा व्यायाम केल्याने ब्लड शुगर लवकर कमी होते.
advertisement
5/6
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार जास्त करून रात्री जेवल्यावर चालणे हे डायबिटीज रुग्णांसाठी जास्त फायदेशीर मानले जाते. मात्र दिवसभरात जसा वेळ मिळेल तास शारीरिक व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diabetes Control Tips : डायबिटीजच्या रुग्णांनी 'या' वेळी करा एक्सरसाइज, लवकर कमी होईल शुगर, एकदा ट्राय करून बघाच