Desi Jugaad: स्लायडिंग विंडोमध्ये अडकलेली घाण कशी स्वच्छ करायची? कागदाचा एक तुकडा करेल मदत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
दारं तर सहज साफ करता येतात. मात्र आता बहुतांश घरांमध्ये स्लायडिंग खिडक्या असतात. या खिडक्या साफ करायला खूप अवघड जातात.
advertisement
1/7

Diwali Cleaning tips: हळूहळू घरातील भागांची आणि वस्तूंची साफसफाई करेपर्यंत दिवाळी जवळ आलीही. दिवाळीपूर्वी घरातील दारं खिडक्या साफ कारण खूप गरजेचं असत. कारण लक्ष्मी माता घरात प्रवेश करताना आपले घराचे प्रवेशद्वार स्वच्छ असणे आवश्यक आहे.
advertisement
2/7
दारं तर सहज साफ करता येतात. मात्र आता बहुतांश घरांमध्ये स्लायडिंग खिडक्या असतात. या खिडक्या साफ करायला खूप अवघड जातात. स्लायडिंग डोअर असलेल्या या खिडक्यांना खाली खाचे असते असतात आणि याच जागा साफ करायला जास्त अवघड जातात.
advertisement
3/7
खिडकीची काच तर सहज साफ करता येते. मात्र खिडकीच्या या अरुंद जागांमधील धूळ माती सहज काढता येत नाही. अशावेळी त्याच्यातील घाण तशीच राहून जाते किंवा मग ती काढण्यासाठी बाजारातील महागड्या वस्तू आणाव्या लागतात. हीच खिडकी सहज स्वच्छ करण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊया.
advertisement
4/7
खिडकीच्या खालच्या भागातील धूळ माती काढण्यासाठी सुरुवातीला पाण्याची गरज नाही. आधी केसांना मेहंदी लावण्याचा एखादा ब्रश, टूथ ब्रश घ्या आणि त्याच्या साहाय्याने या भागातील माती आणि घाण एक बाजूला घ्या. त्यानंतर हाताने जेवढी घाण काढता येईल तेवढी काढून घ्या.
advertisement
5/7
हातात येईल अशी घाण निघाल्यानंतर खाली धूळ आणि मातीच उरते. तर ही माती काढण्यासाठी कागदाचा एक लहान तुकडा घ्या आणि तो त्या खाचेमध्ये टाका. त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने ती माती कागदावर घ्या आणि बाहेर काढा. अशाप्रकारे हळूहळू सर्व माती बाहेर काढता येईल.
advertisement
6/7
आता खिडकीच्या काचा स्वच्छ करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी आणि डिटर्जन्टपावडर मिक्स करून घ्या. हे मिश्रण खिडकीच्या काचांवर स्प्रे करा आणि नंतर कापडाने ते पुसून घ्या. अशाप्रकारे काचेच्या दोन्ही बाजू व्यवस्थित पुसून घ्या. त्यानंतर या काचांवर पुन्हा साधे पाणी टाका आणि आता या काचा पेपरच्या किंवा कोणत्याही कागदाच्या साहाय्याने पुसून घ्या. याने खिडकी अगदी चकचकीत दिसेल.
advertisement
7/7
खिडकीची जाळी स्वच्छ करण्यासाठी डिटर्जंट आणि पाण्याचे मिश्रण त्या जाळीवर स्प्रे करा. त्यानंतर कपडे धुण्याच्या ब्रशने ही जाळी व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. यानंतर एखाद्या कापडाने जाळी पुसून घ्या. अशाप्रकारे स्वच्छ करण्यासाठी अवघड वाटणारी खिडकी अगदी सहज साफ होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Desi Jugaad: स्लायडिंग विंडोमध्ये अडकलेली घाण कशी स्वच्छ करायची? कागदाचा एक तुकडा करेल मदत