Leg Cramps : रात्री झोपेत तुम्हालाही क्रॅम्प्स येतात? मग शरीरात आहे या गोष्टींची कमी!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
अनेकांना अचानक पायात क्रॅम्प्स येतात. खास करुन रात्री झोपल्यावर. तुमच्यासोबतही असं होत असेल तर तुमच्या शरीरात काही गोष्टींची कमतरता आहे समजून जा.
advertisement
1/6

अनेकांना अचानक पायात क्रॅम्प्स येतात. खास करुन रात्री झोपल्यावर. तुमच्यासोबतही असं होत असेल तर तुमच्या शरीरात काही गोष्टींची कमतरता आहे समजून जा.
advertisement
2/6
शरीरात पोषक तत्वांची कमतरता, रेस्टलेस लेग सिंड्रोम, स्नायू संबंधित समस्यांमुळेही ही समस्या उद्भवू शकते.
advertisement
3/6
Lamwag वर प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, शरीरात व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे रेस्टलेस लेग सिंड्रोमचा धोका वाढतो. व्हिटॅमिन बी ची कमतरता टाळण्यासाठी सफरचंद, संत्री, किवी, दही, चीज, केळी, मटार आणि नट्सचे सेवन करत रहा. मांसाहारी लोक त्यांच्या आहारात चिकन, सॅल्मन आणि ट्यूना फिश खाऊ शकतात.
advertisement
4/6
शरीरात कॅल्शियम किंवा लोहाच्या कमतरतेमुळे रात्री झोपतानाही पाय दुखू शकतात. हे टाळण्यासाठी कॅल्शियम युक्त गोष्टी खाव्यात. तुम्ही आहारात दूध, चीज, दही आणि बदाम घेऊ शकता. त्याच वेळी, लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, तुम्ही पालक, ब्रोकोली, नट्स, राजमा आणि चणे खाऊ शकता.
advertisement
5/6
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे रात्रीच्या वेळी पाय सुन्न होणे, क्रॅम्प्स ही समस्या देखील होऊ शकते. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे त्याचा थेट परिणाम हाडांवर होतो.
advertisement
6/6
जेव्हा हाडे कमकुवत होऊ लागतात तेव्हा मज्जातंतूशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे डोपामाइनवर परिणाम होतो, ज्यामुळे रेस्टलेस लेग सिंड्रोमचा धोका सर्वाधिक असतो. व्हिटॅमिन डीची कमतरता टाळण्यासाठी सकाळी सूर्यप्रकाश घ्यावा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Leg Cramps : रात्री झोपेत तुम्हालाही क्रॅम्प्स येतात? मग शरीरात आहे या गोष्टींची कमी!