Do You Know : नशा करणारा पक्षी कोणता? तुमच्या आजूबाजूला असतो, पण 99 टक्के लोकांना उत्तर सांगताच येणार नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एक डोक चक्रावणारा प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, जो तुम्हाला गोंधळात टाकेल.
advertisement
1/9

MPSC, UPSC किंवा विविध IQ परीक्षांमध्ये कधी-कधी असे प्रश्न विचारले जातात की, ऐकूनच आपण चक्रावून जातो. सामान्य ज्ञान म्हणजे फक्त इतिहास, भूगोल किंवा चालू घडामोडी नव्हे, तर निसर्ग, प्राणी-पक्षी आणि त्यांच्या वागणुकीशी संबंधित प्रश्नही यात येतात. अनेक वेळा अशा वेगळ्या प्रश्नांची उत्तरं लक्षात राहतात आणि परीक्षेत गुण मिळवून देतात.
advertisement
2/9
असाच एक डोक चक्रावणारा प्रश्न आम्ही तुमच्यासाठी आणला आहे, जो तुम्हाला गोंधळात टाकेल.
advertisement
3/9
असा कोणता पक्षी आहे ज्याला "नशा" करण्याचा शौक आहे?
advertisement
4/9
पहिल्यांदा प्रश्न वाचला की, थोडं हसू येइल आणि तुम्ही विचार करत बसाल की हे कसं शक्य आहे? पक्षी आणि नशा? पण खरोखरच निसर्गात असे काही पक्षी आहेत ज्यांचं हे वेगळं वर्तन नोंदवलं गेलं आहे. आश्चर्य म्हणजे हा पक्षी आपल्या आजूबाजूला आपल्या सहज दिसतो, मग सांगा त्याचं नाव
advertisement
5/9
तुम्हाला उत्तर आठवत नसेल तरी काळजी करु नका आम्ही ते ओळखायला तुम्हाला मदत करु आणि त्यामागचं कारण ही सांगू.
advertisement
6/9
तर हा पक्षी आहे पोपट (Parrot)
advertisement
7/9
काही पोपट, विशेषतः आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या भागांमध्ये आढळतात. हे पोपट विशिष्ट प्रकारच्या फळांचा आहार करतात. या फळांना जेव्हा झाडावरच पिकायला वेळ लागतो तेव्हा त्यामध्ये नैसर्गिक किण्वन (Fermentation) होऊ लागतं. या प्रक्रियेमुळे त्या फळांमध्ये हलकासा मद्यसदृश घटक तयार होतो. जेव्हा पोपट ही फळं खातात, तेव्हा त्यांना थोडासा नशेचा अनुभव येतो.
advertisement
8/9
पक्षीशास्त्रज्ञांनी (Ornithologists) या वर्तनाचा अभ्यास करून तो डॉक्युमेंटही केला आहे. विशेष म्हणजे, हे नशेचे फळ खाल्ल्यानंतर पोपट कधीकधी असामान्य हालचाली करतात, उडण्यात थोडा गोंधळ होतो किंवा खेळकर वर्तन दिसून येतं.
advertisement
9/9
हा प्रकार आपल्याला आश्चर्यकारक वाटला तरी निसर्गात अशी अनेक वेगळी वागणूक प्राणी-पक्ष्यांमध्ये दिसून येते. त्यामुळे पुढच्या वेळी जर एखाद्या परीक्षेत असा प्रश्न आला की "नशा करणारा पक्षी कोण?" तर नक्की उत्तर लक्षात ठेवा, तो आहे पोपट.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Do You Know : नशा करणारा पक्षी कोणता? तुमच्या आजूबाजूला असतो, पण 99 टक्के लोकांना उत्तर सांगताच येणार नाही