Summer Health Tips: उन्हाळ्यात आजारी नाही पडायचं? मग रोज प्या ‘हे’ पाणी
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Health Benefits of lemon Water in summer: बदलत्या वातावरणामुळे मार्च महिन्यातच वैशाख वणव्याच्या झळा बसून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. मार्च महिन्यातच अशी स्थिती असेल तर एप्रिल – मे मध्ये काय होईल या विचारानेच अंगाची लाही लाही होऊ लागलीये. उन्हाच्या तडाख्यात थोडं जरी काम केलं तरी अधिक थकवा येऊ लागतो. मात्र तुम्हाला काम न करता थकवा येत असेल तर ही तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा असू शकते. जर खाली दिलेली लक्षणं किंवा त्रास तुम्हालाही होत असेल तर समजून जा की, तुम्हाला जर रोज एक लिंबू खाणं किंवा लिंबू सरबत पिणं गरजेचं आहे.
advertisement
1/7

थकवा : अगदी थोडा वेळ उन्हात गेल्यावर तुम्हाला थकल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला लिंबू पाण्याची गरज आहे. लिंबू प्याल्यामुळे शरीराचं पीएच संतुलन सुधारून थकवा दूर व्हायला मदत होते.
advertisement
2/7
पचन सुधारतं : लिंबामुळे पोटात अन्न पचवणाऱ्या ॲसिडचं उत्पादन वाढतं. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होऊन अन्न पचायला मदत होते.
advertisement
3/7
तोंडाच्या दुर्गंधीवर गुणकारी : जर तुमच्या तोंडातून दुर्गंधी येत असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या तोंडात बॅक्टेरिया जमा झाले आहेत. लिंबात असलेल्या ॲसिडमुळे तोंडात असलेले बॅक्टेरिया नष्ट होतात. त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर व्हायला मदत होते.
advertisement
4/7
सांधेदुखी : जर तुम्हाला सांधेदुखी किंवा अंगदुखीचा त्रास होत असेल तर लिंबू पाणी पिणं तुमच्या फायद्याचं आहे. लिंबू पाण्यात असलेल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे सांध्यामधली जळजळ दूर होते.
advertisement
5/7
नैराश्य दूर होतं : जर तुम्ही तणावात किंवा नैराश्येत असाल किंवा तुमचा मूड सतत बदलत असेल किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर तुम्हाला लिंबू पाणी पिण्याची नितांत गरज आहे. लिंबू पाण्यात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे तणाव निर्माण करणाऱ्या कॉर्टिसॉल संप्रेरकाचं उत्पादक कमी होऊन तणाव निवळायला मदत होते.
advertisement
6/7
सतत आजारी पडणे : तुम्ही जर सतत आजारी पडत असाल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लिंबू पाणी पिणं फायद्याचं ठरतं. लिंबात असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.
advertisement
7/7
वजन कमी करण्यात फायदेशीर : लिंबात असलेलं व्हिटॅमिन सी चयापचय वाढवून शरीराला त्वरित ऊर्जा देते. वजन कमी करण्यासाठी सकाळी सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. यामुळे शरीराला अतिरिक्त कॅलरीज बर्न व्हायला मदत होण्यासोबतच शरीराला उर्जाही मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Health Tips: उन्हाळ्यात आजारी नाही पडायचं? मग रोज प्या ‘हे’ पाणी