Health Tips : ना वजन वाढते, ना शुगर... रोज खा एक आंबा! तज्ज्ञ सांगतात खाण्याची 'नेमकी' पद्धत्त
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
रुजुता दिवेकर, करिना कपूरच्या न्यूट्रिशनिस्ट, यांचा विश्वास आहे की आंबा खाल्ल्याने वजन वाढत नाही किंवा डायबेटिस होत नाही. आंबा हा फायबर, अँटीऑक्सिडंट्स व पॉलीफेनोल्सचा नैसर्गिक स्रोत...
advertisement
1/7

उन्हाळा आला की लोकांना घाम आणि चिकचिक यामुळे खूप त्रास होतो. पण याच हंगामात निसर्गाने एक अशी गोड भेट दिली आहे, ज्याची लोक वर्षभर वाट पाहतात. आपण बोलतोय फळांचा राजा म्हणजेच आंब्याबद्दल. मात्र, आंब्याचं नाव काढताच अनेकजण तो खाण्यापासून स्वतःला थांबवतात.
advertisement
2/7
कारण, आंबा खाल्ल्याने लठ्ठपणा येईल किंवा मधुमेह वाढेल अशी भीती असते. पण प्रसिद्ध Nutritionist रुजुता दिवेकर यांचं मानलं, तर या 'आंब्याला' नुसता आंबा समजण्याची चूक करू नका. उलट, करीना कपूरच्या या Nutritionist चं ऐकलं तर उन्हाळ्यात तुम्ही दररोज एक आंबा खाऊनही आपलं आरोग्य आनंदी ठेवू शकता.
advertisement
3/7
Nutrition expert रुजुता दिवेकर यांनी सांगितलं की, ताजे आंबे खाल्ल्याने मधुमेह होतो याचा कोणताही पुरावा नाही. इतकंच नाही, तर दररोज एक आंबा खाल्ल्याने तुमचं वजन वाढतं, याचाही कोणताही पुरावा नाही. याउलट, आंबा फायबर, अँटीऑक्सिडंट्स (antioxidants) आणि पॉलीफेनॉलचा (polyphenols) चांगला स्रोत आहे, ज्यात कर्करोगविरोधी गुणधर्म (anti-cancer properties) देखील असू शकतात.
advertisement
4/7
रुजुता यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये सांगितलं, 'हा व्हिडिओ तुम्हाला दरवर्षी प्रमाणे आठवण करून देण्यासाठी आहे की उन्हाळा आला आहे आणि तुम्ही दररोज एक आंबा खायला हवा. आंब्यामुळे ना मधुमेह होतो, ना लठ्ठपणा येतो आणि ना मुरुम येतात.
advertisement
5/7
फक्त आंबा खाण्यापूर्वी अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवा, मग खा. आंबा स्वादिष्ट, गोड आहे, यात फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल आहेत. ज्या सर्व गोष्टी तुम्ही Wellness Products मध्ये शोधता, त्या या नैसर्गिक फळात आहेत.'
advertisement
6/7
रुजुता त्यांच्या व्हिडिओमध्ये पुढे म्हणतात, आंबा हे असं फळ आहे, ज्याच्या हंगामाची लोक आजही वाट पाहतात. आंबा नैसर्गिकरित्या पिकण्याची, मग तो कापून त्याची चव, रस आणि सुगंध अनुभवण्याची आपण वाट पाहतो.
advertisement
7/7
स्वतःला या अनुभवापासून वंचित ठेवू नका, कारण दररोज एक आंबा खाल्ल्याने उदासी (sadness) दूर होऊ शकते, आणि आजच्या काळात याची गरज आपल्या सर्वांना आहे. रुजुता सांगतात की, अमेरिकन डायबेटिक असोसिएशन देखील हंगामातील आंबे खाण्याची शिफारस करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : ना वजन वाढते, ना शुगर... रोज खा एक आंबा! तज्ज्ञ सांगतात खाण्याची 'नेमकी' पद्धत्त