TRENDING:

Sugarcane Juice: हिवाळ्यात उसाचा रस आरोग्यासाठी चांगला असतो का? डॅाक्टरांनी स्पष्ट सांगितलं

Last Updated:
हिवाळा सुरू होताच थंडीमुळे सर्दी, खोकला, थकवा आणि अशक्तपणाच्या तक्रारी वाढताना दिसतात. तापमानात होणाऱ्या घटमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आहारात योग्य पोषणमूल्य असलेले पदार्थ समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
1/6
हिवाळ्यात उसाचा रस आरोग्यासाठी चांगला असतो का? डॅाक्टरांनी स्पष्ट सांगितलं
हिवाळा सुरू होताच थंडीमुळे सर्दी, खोकला, थकवा आणि अशक्तपणाच्या तक्रारी वाढताना दिसतात. तापमानात होणाऱ्या घटमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आहारात योग्य पोषणमूल्य असलेले पदार्थ समाविष्ट करणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे.
advertisement
2/6
हिवाळ्यात अंडी आणि ऊस हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी उपयुक्त ठरत असून, ते नियमित आणि संतुलित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला बीड जिल्ह्यातील विलास राठोड या तज्ज्ञांकडून दिला जात आहे. अंडी हे प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत मानले जातात. त्यामध्ये व्हिटॅमिन A, D, B12, आयर्न, झिंक आणि आवश्यक ॲमिनो आम्ल मुबलक प्रमाणात असतात.
advertisement
3/6
हिवाळ्यात अंडी खाल्ल्याने शरीराला आवश्यक उष्णता मिळते आणि स्नायू मजबूत राहतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास अंडी मदत करतात. विशेषतः कामगार वर्ग, तरुण तसेच वयोवृद्ध व्यक्तींनी हिवाळ्यात आहारात अंड्यांचा समावेश केल्यास थकवा कमी होऊन कार्यक्षमता वाढते, असे पोषणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
advertisement
4/6
हिवाळ्यात पचनसंस्था मंदावल्याने अनेकांना अपचन व बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अशा वेळी ऊस हा नैसर्गिक उपाय ठरू शकतो. ऊसामध्ये नैसर्गिक साखर, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ऊस खाल्ल्याने पचन सुधारते आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. त्यामुळे ग्रामीण भागात हिवाळ्यात ऊस खाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
advertisement
5/6
तज्ज्ञांच्या मते, ऊस किंवा उसाचा रस यकृताच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. थंडीत मर्यादित प्रमाणात ऊस सेवन केल्यास शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच त्वचा तजेलदार राहते आणि अशक्तपणा कमी होतो. मात्र मधुमेह असलेल्या रुग्णांनी ऊस किंवा उसाचा रस सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञ सांगतात.
advertisement
6/6
एकूणच हिवाळ्यात योग्य आहाराची निवड केल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. अंडी आणि ऊस हे दोन्ही पदार्थ पोषणमूल्यांनी समृद्ध असून, संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा वापर करणे आरोग्यास लाभदायक ठरते. मात्र कोणताही पदार्थ अति प्रमाणात न घेता वैयक्तिक प्रकृतीनुसार सेवन करणे गरजेचे असल्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Sugarcane Juice: हिवाळ्यात उसाचा रस आरोग्यासाठी चांगला असतो का? डॅाक्टरांनी स्पष्ट सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल