Hair Care Tips : रोज हेल्मेट वापरलं तरी होणार नाही केसगळती! तज्ज्ञांनी सांगितलेल्या 'या' भन्नाट ट्रिक्स करा फॉलो..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Hair Loss Due To Helmet : हेल्मेट वापरणं आपल्या सुरक्षिततेसाठी खूप गरजेचं आहे. मात्र बरेच लोक हेल्मेट घातल्यामुळे केस गाळण्याची तक्रार करतात. आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत की, हेल्मेट घातल्याने केस का गळतात? आणि त्यावर काही उपायही आपण पाहणार आहोत.
advertisement
1/9

केस गळतीची एकच विशेष कारण सांगणे अवघड असते. कारण बऱ्याचदा आपल्या जीवनशैलीमुळे, पोषक तत्वांच्या अभावामुळे किंवा ताणतणावामुळेही केस गळती होऊ शकते. मात्र हेल्मेटचा देखील केसांवर परिणाम होतो. तो कसा आणि का.. चला जाऊन घेऊया तज्ज्ञांकडून.
advertisement
2/9
गुरुग्राम येथील मारिंगो एशिया हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ त्वचारोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका हेमराजानी यांनी जागरणाला माहिती देताना सांगितले की, 'ट्रॅक्शन अलोपेसिया हे याचे मुख्य कारण असू शकते. केसांच्या मुळांवर सतत ओढल्या गेल्यामुळे ताण आणि घर्षण निर्माण झाल्यामुळे केस गळती हिऱ्यांचा हा एक प्रकार आहे.'
advertisement
3/9
हेल्मेट खूप टाईट आले तर टाळूच्या काही भागांवर सतत ते घासले जाते. केसांच्या मुळांवर पडणारा हा दाब त्यांना कमकुवत करतो. त्याचबरोबर हेल्मेटमध्ये साचलेला घाम, उष्णता आणि नैसर्गिक तेल यामुळे टाळूचा त्रास वाढतो, मुळांचे नुकसान होते आणि केस गळतात.
advertisement
4/9
पण यावरही काही उपाय आहेत तुम्ही त्यांचा अवलंब करून केसगळती रोखू शकता. सर्वात आधी तर योग्य हेल्मेट निवडा. नेहमी असे हेल्मेट खरेदी करा, जे योग्य फिटिंगमध्ये असेल. म्हणजेच तुमच्या डोक्यावर व्यवस्थित बसेल. टाईट होणार नाही किंवा सैलही होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यात हवा खेळती राहिली पाहिजे.
advertisement
5/9
डायरेक्ट हेल्मेट घालणं टाळा. नेहमी हेल्मेट घालण्यापूर्वी कॉटनची किंवा घाम शोषून घेणारी टोपी घाला. यामुळे केसांमध्ये घर्षण टळेल, टाळूला त्रास होणार नाही आणि घामदेखील व्यवस्थित सुकेळी.
advertisement
6/9
हेल्मेट वारंवार स्वच्छ करणं शक्य नसल्यास त्याची योग्य काळजी घ्या. म्हणजे ते हवेशीर ठेवा. जेणेकरून त्यामध्ये बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढणार नाहीत. यासाठी हेल्मेटमधील पॅड नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवा. बाजारात मिळणाऱ्या क्लीनर्सचा तुम्ही वापर करू शकता.
advertisement
7/9
तुमचे केस खूप लांब असतील तर तुम्हाला हेल्मेट घालताना विशेष काळजी घ्यावी लागेल. हेल्मेट घालायचे असताना घट्ट पोनीटेल किंवा वेणी बंधू नये. केसांवर ताण येऊ नये म्हणून केस मोकळे सोडणंच योग्य ठरेल.
advertisement
8/9
हेल्मेटच्या रोजच्या वापराने जर तुम्हाला केस पातळ होणे, केसगळती किंवा टाळायच्या काही समस्या जमणार असतील तर त्वरित तज्ज्ञांशी संपर्क साधा. 'ट्रॅक्शन अलोपेसिया' पूर्णपणे बरा होऊ शकतो. खराब झालेले केस पुन्हा वाढविण्यासाठी अनेक आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. म्हणून तज्ज्ञांशी संपर्क साधणं आवश्यक आहे.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Hair Care Tips : रोज हेल्मेट वापरलं तरी होणार नाही केसगळती! तज्ज्ञांनी सांगितलेल्या 'या' भन्नाट ट्रिक्स करा फॉलो..