Mumbai : समुद्र, सनसेट आणि बरंच काही… फक्त 0 रुपयात फिरू शकता मुंबईमधील 'ही' ठिकाणं!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
कोण म्हणत तुम्ही शून्य रुपयात फिरू शकत नाही? जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. मुंबईमध्ये सुंदर पण शून्य रुपये खर्च करून तुम्ही फिरण्याची मज्जा घेऊ शकता.
advertisement
1/7

कोण म्हणत तुम्ही शून्य रुपयात फिरू शकत नाही? जर तुम्हीही असाच विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. मुंबईमध्ये सुंदर पण शून्य रुपये खर्च करून तुम्ही फिरण्याची मज्जा घेऊ शकता. हा, फक्त प्रवासाचा खर्च मात्र तुम्हाला करावा लागतो. पण अशी काही ठिकाणं आहेत जिथे कोणतेही शुल्क न देता तुम्ही फिरू शकता.
advertisement
2/7
मुंबईमध्ये अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही एकही रुपया खर्च न करता तुम्ही त्या जागेचा आणि वातावरणाचा आनंद घेऊ शकता. चला तर जाणून घेऊयात अशी ठिकाणे.
advertisement
3/7
मरीन ड्राइव्ह - जर तुम्हाला समुद्र, सनसेट आणि रोमँटिक वातावरण अनुभवायचं असेल तर तुम्ही मरीन ड्राइव्ह, वरळी सीलिंक गिरगाव किंवा जुहू चौपाटीला जाऊन आरामात आपल्या आवडत्या व्यक्तीसह सनसेट पाहत वेळ घालवू शकता.
advertisement
4/7
सीएसटी स्टेशन - जर तुम्हाला वास्तुकला किंवा हेरिटेज गोष्टींमध्ये रस असेल आणि तुम्ही उत्सुक असाल तर तुम्ही मुंबईतील सर्वात जुन्या आणि वास्तुकलेचा उत्तम मेळ असलेल्या सीएसटी स्टेशनला भेट द्या.
advertisement
5/7
सायकलिंग - जर तुम्हाला सायकलिंग करायची आवड असेल आणि एक सिनेमॅटिक नजाऱ्यासह तुम्हाला सायकलिंग करायची इच्छा असेल तर तुम्ही एका नक्कीच कफ परेडला भेट द्या.
advertisement
6/7
हँगिंग गार्डन - जर तुम्हाला तुमचा जोडीदारासह छान वेळ घालवायचा असेल आणि तेही विना कोणत्याही खर्चाशिवाय तर मुंबईतील हँगिंग गार्डन हा एक उत्तम पर्याय आहे.
advertisement
7/7
छोटा काश्मीर - काश्मीर जायचा प्लॅन करताय पण येतोय अडथळा, टेंशन नका घेऊ त्या आधी मुंबईमधील छोटा काश्मीर तर फिरा. छोटा काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे कॉलनीजवळ तुम्ही लेकमध्ये बोटींगची मज्जा घेऊ शकता. इथे तुम्हाला फिरण्यासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत पण बोटिंगसाठी द्यावे लागतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mumbai : समुद्र, सनसेट आणि बरंच काही… फक्त 0 रुपयात फिरू शकता मुंबईमधील 'ही' ठिकाणं!