Best Food Spot In Pune: वडापाव ते मिसळ, पारंपरिक पदार्थांची अस्सल चव, खाण्यासाठी पुण्यातील 6 ठिकाणांना द्या भेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Best Food Spot In Pune: तुम्ही खवय्ये असाल, तर पुण्यातील ही काही खास ठिकाणे तुमच्यासाठी पर्वणी ठरणार आहेत. याठिकाणी आवश्य भेट द्या.
advertisement
1/7

पुणे हे फक्त विद्येचं माहेरघर नाही, तर चविष्ट खाद्यसंस्कृतीसाठीही ते तितकंच प्रसिद्ध आहे. येथे पारंपरिक खाद्यपदार्थांपासून ते फ्युजन डिशेसपर्यंत असंख्य पर्याय उपलब्ध आहेत.
advertisement
2/7
जर तुम्ही खवय्ये असाल, तर पुण्यातील ही काही खास ठिकाणे तुमच्यासाठी पर्वणी ठरणार आहेत. याठिकाणी आवश्य भेट द्या.
advertisement
3/7
बिपिन स्नॅक्स सेंटर – सकाळच्या नाश्त्याचं उत्तम ठिकाण इथे पोहे, ब्रेड पॅटीज आणि काकडी खिचडी यांसारख्या पारंपरिक पदार्थांची चव इथे खास आहे. ठिकाण: विमलाबाई गरवारे शाळेजवळ, डेक्कन कॉर्नर, पुणे
advertisement
4/7
सपकाळ मटकी भेळ - इथे चविष्ट अशी मटकी भेळ मिळते. मटकी भेळचं अनोखं कॉम्बिनेशन सपकाळ भेळेमध्ये वापरली जाणारी उकडलेली मटकी आणि त्यासोबत आलेली भेळ ही चवीलाही ताजीतवानी आणि आरोग्यासाठी चांगली आहे. खवय्यांची मोठी गर्दी इथे असते. ठिकाण : पासोड्या विठोबा मंदिर बुधवार पेठ
advertisement
5/7
विश्रांती गृह – हे अनेक खवय्यांचं आवडतं ठिकाण असून वडा सॅम्पल, बटाटा वडा, रस्सा पाव, साबुदाणा वडा ही खासियत असून, आंबट, गोड आणि तिखट अशा प्रकारे वडा बनवला जातो. खास वडा, जो एकदा खाल्ला तरी पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. ठिकाण : केळकर रोड, शनिवार पेठ, पुणे
advertisement
6/7
पुणे मिसळ हाऊस - मिसळीचं जुनं ठिकाण असून दोन तीन प्रकारच्या मिसळ मिळतात. तूप पुणेरी मिसळ, बाजीराव मिसळ, कोल्हापुरी मिसळ असून खवय्यांची मोठी गर्दी असते. ठिकाण : डी. पी रोड म्हात्रे ब्रिज एरंडवणे
advertisement
7/7
गार्डन वडापाव - वडापाव म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतंच गरमागरम आणि अगदी चविष्ट असा हा पुण्याचा फेमस गार्डन वडापाव, हा वडापाव खाण्यासाठी रांगेत थांबावं लागतं. गर्दी इतकी वाहतूकदारांना रस्ता द्यावा लागतो, आणि चव अशी की विदेशी पर्यटक आवर्जून वडापाव खाण्यासाठी येतात. ठिकाण : कॅम्प परिसर
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Best Food Spot In Pune: वडापाव ते मिसळ, पारंपरिक पदार्थांची अस्सल चव, खाण्यासाठी पुण्यातील 6 ठिकाणांना द्या भेट