TRENDING:

Famous Dairy In Pune: शुद्ध डेअरी पदार्थांसाठी प्रसिद्ध, पुण्यात फेमस आहे ही डेअरी, तुम्ही कधी दिलीये का भेट?

Last Updated:
पुणे शहर हे केवळ शिक्षणाचे आणि संस्कृतीचे केंद्र नाही, तर येथे अनेक जुने आणि परंपरागत व्यवसाय आजही आपली ओळख टिकवून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शुक्रवार पेठेतील कैलास डेअरी.
advertisement
1/7
शुद्ध डेअरी पदार्थांसाठी प्रसिद्ध, फेमस आहे ही डेअरी, तुम्ही कधी दिलीये का भेट?
पुणे शहर हे केवळ शिक्षणाचे आणि संस्कृतीचे केंद्र नाही, तर येथे अनेक जुने आणि परंपरागत व्यवसाय आजही आपली ओळख टिकवून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे शुक्रवार पेठेतील कैलास डेअरी. 1964 साली गिरीष अग्नानी यांचे आजोबा यांनी सुरू केलेली ही डेअरी आज पुण्याच्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे.
advertisement
2/7
शुद्ध डेअरी पदार्थांसाठी प्रसिद्ध, फेमस आहे ही डेअरी, तुम्ही कधी दिलीये का भेट?
सुरुवातीला केवळ दूध, दही, लस्सी आणि कोल्ड्रिंक्स पुरवणाऱ्या या छोट्याशा डेअरीने गेल्या सहा दशकांत मोठा प्रवास केला आहे. आज येथे लस्सी, बासुंदी, कुल्फी, रबडी, फालुदा, कलाकंद यांसारखे विविध स्वादिष्ट आणि शुद्ध डेअरी उत्पादने मिळतात.
advertisement
3/7
विशेष म्हणजे, ही सर्व उत्पादने कोणतीही कृत्रिम रंग वा केमिकल्स न वापरता पारंपरिक पद्धतीने तयार केली जातात.सध्या अग्नानी कुटुंबाची तिसरी पिढी हा व्यवसाय समर्थपणे पुढे नेत आहे.
advertisement
4/7
जुन्या पद्धती आणि चव कायम ठेवत त्यांनी व्यवसायात आधुनिकतेची जोड दिली आहे. कैलास डेअरीमधील सर्वाधिक लोकप्रिय उत्पादने म्हणजे लस्सीचे विविध प्रकार मँगो, ब्लूबेरी, रोज पिस्ता, ड्रायफ्रूट आदी.
advertisement
5/7
ही लस्सी केवळ 25 रुपयांपासून सुरु होते, ज्यामुळे ती सर्वसामान्यांनाही सहज उपलब्ध आहे. ऋतू कोणताही असो, येथे नेहमीच ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते.
advertisement
6/7
बासुंदी कुल्फीसाठी देखील ही डेअरी प्रसिद्ध असून, तिच्या खास चवेमुळे ती अनेक वर्षांपासून पुणेकरांची आवडती राहिली आहे. कैलास डेअरी ही फक्त एक डेअरी नसून, पुण्याच्या सांस्कृतिक आणि खाद्य परंपरेचा अविभाज्य भाग बनली आहे.
advertisement
7/7
गुणवत्तेचा वारसा, पारंपरिक मूल्ये आणि आधुनिकतेचा समतोल राखत, अग्नानी कुटुंबीय ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोचवण्याचे काम करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Famous Dairy In Pune: शुद्ध डेअरी पदार्थांसाठी प्रसिद्ध, पुण्यात फेमस आहे ही डेअरी, तुम्ही कधी दिलीये का भेट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल