TRENDING:

दही सर्वजण खातात, पण कमी लोकांना माहित असते खाण्याची योग्य पद्धत, तुम्ही करू नका 'ही' चूक!

Last Updated:
आता थंडी बऱ्यापैकी ओसरली आहे. तापमान जसजसं वाढतंय, तसतसं उकडायला लागलंय. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं अगदी नकोसं होतं. अशावेळी आपण भरपूर पाणी पितो आणि हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करतो. तसंच शरीरात गारवा निर्माण करणारे पदार्थ खातो. दही त्यापैकीच एक. (विशाल तिवारी, प्रतिनिधी)
advertisement
1/5
कमी लोकांना माहित असते दही खाण्याची योग्य पद्धत, तुम्ही करू नका 'ही' चूक!
उन्हाळ्यात दह्याला मोठी मागणी असते. दह्यामुळे शरीरात गारवा निर्माण होतोच, शिवाय आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. परंतु उन्हाळ्यात दही नेमकं खावं कसं हे माहित असणं आवश्यक आहे.
advertisement
2/5
दही चवीला थंड लागत असलं तरी ते गरम असतं. त्यामुळे त्यात थोडं पाणी मिसळावं, जेणेकरून ते बॅलन्स होतं आणि त्यामुळे शरीराचं कोणतंही नुकसान होत नाही, तर फायदेच फायदे मिळतात.
advertisement
3/5
आयुर्वेदिक डॉक्टर नेहा गोयल यांनी सांगितलं की, रात्रीच्या वेळी दही खाऊ नये, त्यामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं, आरोग्य बिघडू शकतं. सामान्यपणे लोक साखर घातलेलं दही खातात, काहीजण जीरा पावडर घालून दही खातात. तसंच मीठ घालून दही खाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु मीठ घातलेलं दही आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं.
advertisement
4/5
साखर, आवळा पावडर किंवा मध मिसळून दही खावं. यातून शरीराला विविध पोषक तत्त्व मिळतात. दह्यातून कॅल्शियम, व्हिटॅमिन, मिनरल्स भरभरून मिळू शकतात, तसंच मेंदूही ताकदवान होतो, हाडं भक्कम होतात. परंतु दही कधीच गरम करून खाऊ नये.
advertisement
5/5
बऱ्याचदा थेट दही खाल्ल्यानंही त्वचेच्या समस्या होऊ शकतात, पचनसंस्था बिघडू शकते, शरीराचं तापमान वाढू शकतं. त्यामुळे दह्यात थोडं पाणी मिसळून खावं, परंतु त्यात मीठ अजिबात घालू नये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
दही सर्वजण खातात, पण कमी लोकांना माहित असते खाण्याची योग्य पद्धत, तुम्ही करू नका 'ही' चूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल