मुंबईतील हे आयकॉनिक आईस्क्रीम शॉप तुम्हाला माहित आहे का? जिथे कलाकारांपासून सामान्य लोकांची प्रचंड गर्दी
Last Updated:
Rustom Ice Cream : मुंबईतील एक आइसक्रीम पार्लर आहे जे प्रत्येकाच्या आवडते आहे. चला तर जाणून घ्या नेमकं ते ठिकाण कोणतं आहे.
advertisement
1/7

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आईसक्रीमची क्रेझ असते. गरमी असो किंवा थंडी आईसक्रीम खाण्याचा आनंद वेगळाच असतो. अनेकदा लोक आवडत्या फ्लेवर्ससाठी लांबून लांबून प्रवास करून प्रसिद्ध आईसक्रीम पार्लरमध्ये जातात.
advertisement
2/7
काहींना क्लासिक व्हॅनिला आवडते तर काहींना चॉकलेट, स्ट्रॉबेरी किंवा खास फ्युजन फ्लेवर्सची मजा घ्यायला आवडते. शहरातील काही ठिकाणे तर इतकी लोकप्रिय आहेत की तिथे नेहमीच मोठी गर्दी असते. कुठे थंडगार आईसक्रीम सँडविच, तर कुठे ताज्या फळांचे फ्लेवर्स प्रत्येक ठिकाणी काहीतरी खास असते. म्हणूनच आईसक्रीम ही फक्त डेझर्ट नाही, तर एका गोड आठवणींचा भाग बनून राहिली आहे.
advertisement
3/7
आज आपण मुंबईत असणाऱ्या अशाच एका प्रसिद्ध ठिकाणा बद्दल जाणून घेऊयात. ज्या ठिकाणी आईसक्रीमची मिळते आणि ते खाण्यासाठी लांबून लांबूल लोक येत असतात. नक्की हे ठिकाण मुंबईत कुठे आहे आणि का हे प्रसिद्ध याबाबत माहिती जाणून घेऊयात.
advertisement
4/7
हे ठिकाण म्हणजे चर्चगेटजवळील ब्रेबॉर्न स्टेडियमच्या जवळ असलेले 'के रुस्तम आइसक्रीम पार्लर'. साधारण हे आइसक्रीम पार्लर1953 साली सुरू झाले होते ते आजवरही सुरु आहे तेही खवय्यांच्या गर्दीने.मुंबईला गेलात तर रुस्तमचं आईस्क्रीम खायलंच हवं अशी एक परंपरा शहरात तयार झाली आहे.
advertisement
5/7
रुस्तमच्या आइसक्रीम पार्लरची गोष्ट केवळ एका दुकानाची नाही तर मुंबईच्या बदलत्या खाद्यसंस्कृतीची साक्ष देणारी गोष्ट नक्कीच आहे. 1950 च्या दशकात शहरात आइसक्रीमचे मर्यादित पर्याय उपलब्ध असताना या पार्लरने आपल्या वेगळेपणाने ग्राहकांना आजही ठिकून ठेवले आहे.
advertisement
6/7
अनेकांना विचार आला असेल नेमकं काय आहे यात विशेष?यात विशेष म्हणजे जे आइसक्रीम सँडविच. हे आइसक्रीम देत असताना दोन पातळ कुरकुरीत बिस्किटासारख्या ब्रेडच्या स्लाइस असतात आणि त्यामध्ये जाड थराचं आइसक्रीम ठेवलेले असते.
advertisement
7/7
चर्चगेट स्थानकापासून फक्त काही मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे कॉलेज विद्यार्थी, पर्यटन मंडळी आणि ऑफिस वाले तसेच ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये येणारे क्रिकेटप्रेमी अशी विविध ग्राहकांची गर्दी या पार्लरमध्ये असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
मुंबईतील हे आयकॉनिक आईस्क्रीम शॉप तुम्हाला माहित आहे का? जिथे कलाकारांपासून सामान्य लोकांची प्रचंड गर्दी