बाजरी वडी अन् ढोकळा, 35 वर्ष झालं पुण्यात प्रसिद्ध गृह उद्योग, तुम्ही कधी चाखलीय इथली चव?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुण्यातील जंगली महाराज रस्ता परिसरात असून इथे मिळणारे पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. त्यांची चव देखील मन तृप्त करणारी असल्याने खवय्ये आवर्जून हे खाण्यासाठी येतात.
advertisement
1/7

पुणे शहरात अनेक जुने गृह उद्योग पाहायला मिळतात. यामुळे जुन्या पुण्याची आठवण कायम राहते. हीच ओळख जपण्याचे काम गुर्जरी महिला गृह उद्योग गेली 35 वर्ष झाले करत आहे.
advertisement
2/7
पुण्यातील जंगली महाराज रस्ता परिसरात असून इथे मिळणारे पदार्थ खाण्यासाठी खवय्यांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. त्यांची चव देखील मन तृप्त करणारी असल्याने खवय्ये आवर्जून हे खाण्यासाठी येतात.
advertisement
3/7
शहरातील नाना पेठ परिसरात राहिला असणारे राजू रासकर हे गेली अनेक वर्ष झाले पुण्यातील जे. एम. रोड या ठिकाणी गुर्जरी महिला गृह उद्योग चालवत आहेत. त्यांच्या मालकिणीचा हा व्यवसाय होता.
advertisement
4/7
तेव्हा दोन रुपये महिना याप्रमाणे पगार त्यांना मिळत असे. नंतर पुढे आजी गेल्यानंतर हा व्यवसाय असाच पुढे सुरू ठेवला आहे.
advertisement
5/7
या व्यवसायाच्या माध्यमातून 5 महिलांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. त्यांच्याकडे समोसा, कचोरी आणि बाजरी वडी, ढोकळा, थेपले हे पदार्थ ते खाण्यासाठी खवय्यांची प्रचंड गर्दी असते.
advertisement
6/7
संध्याकाळी 5 ला हा गृह उद्योग सुरु होतो तर 7.30 पर्यंत सुरू असतो. या कामात माझी पत्नी देखील मला मदत करते. गेली 35 वर्षे झाली हा व्यवसाय सुरू आहे आणि तो वाढवण्यासाठी महिला काम करण्यासाठी मिळत नाहीत.
advertisement
7/7
त्यामुळे अगदी छोट्या टेम्पोमध्ये हा व्यवसाय अजूनही सुरू आहे. हे पदार्थ खवय्यांच्या आवडीचे असल्यामुळे खवय्ये आवर्जून इथे येतात. संध्याकाळपर्यंत काही शिल्लक राहत नाही, असं राजू रासकर सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
बाजरी वडी अन् ढोकळा, 35 वर्ष झालं पुण्यात प्रसिद्ध गृह उद्योग, तुम्ही कधी चाखलीय इथली चव?