TRENDING:

Summer Special Recipe : लिंबाचा नाद सोडा, तापलेल्या उन्हात बनवा आंबट-गोड कैरीचा सरबत, आरोग्यदायी रेसिपी

Last Updated:
नेहमी लिंबू सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर या उन्हाळ्यात बनवून बघा कैरीच सरबत. अगदी कमीत कमी वेळात आंबट गोड असं कैरीच सरबत तयार होते. 
advertisement
1/6
लिंबाचा नाद सोडा, तापलेल्या उन्हात बनवा आंबट-गोड कैरीचा सरबत, आरोग्यदायी रेसिपी
उन्हाळ्यामध्ये अनेक प्रकारचे सरबत बनवले जातात. जास्तीत जास्त बनवले जाणारे म्हणजे लिंबू सरबत. नेहमी लिंबू सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर या उन्हाळ्यात बनवून बघा कैरीचे सरबत.
advertisement
2/6
अगदी कमीत कमी वेळात आंबट गोड असं कैरीचे सरबत तयार होते. त्याचबरोबर शरीर थंड ठेवण्यास सुद्धा मदत करते. याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी जया भोंडे यांनी सांगितली आहे.
advertisement
3/6
कैरीचे सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य : बारीक कापलेली कैरी, काळे मीठ, सब्जा, साखर, थंड पाणी, बर्फाचे तुकडे, आवडत असल्यास पुदिना सुद्धा घेऊ शकता. कैरीची साल काढून त्याचे काप करायचे आहे.
advertisement
4/6
कैरीचे सरबत बनवण्याची कृती : कैरीचे सरबत बनवण्याची सर्वात आधी कैरी मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. बारीक करताना त्यात थोडे पाणी टाकून घ्यायचे. कैरी बारीक झाल्यानंतर त्यात थंड पाणी टाकून घ्यायचं. ते चाळणीने गाळून घ्यायचं आहे.
advertisement
5/6
त्यानंतर त्यात काळे मीठ, साखर आणि बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आणि ते व्यवस्थित मिक्स होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आणखी ते मिश्रण गाळून घ्यायचं आहे.
advertisement
6/6
त्यानंतर सरबत तयार झालेलं असेल. ग्लासमध्ये घेतल्यानंतर अर्ध्या चमचा सब्जा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर सरबत पिण्यासाठी तयार असेल. कमीत कमी वेळात टेस्टी असं सरबत तुम्ही नक्की बनवून बघा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Summer Special Recipe : लिंबाचा नाद सोडा, तापलेल्या उन्हात बनवा आंबट-गोड कैरीचा सरबत, आरोग्यदायी रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल