Kandepohe : परफेक्ट कांदेपोह्यांसाठी पोहे आणि कांद्याचं प्रमाण किती असावं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Perfect Kandepohe Recipe Tips : अनेकदा कांदेपोहे बिघडतात. यामागचं एक मुख्य कारण म्हणजे कांदे आणि पोह्यांचं चुकीचं प्रमाण. मग प्रश्न असा पडतो कांदेपोहे करताना कांदे आणि पोह्यांचं नेमकं प्रमाण किती असायला हवं?
advertisement
1/5

कांदेपोहे हा सर्वात लोकप्रिय नाश्त्यांपैकी एक आहे. घरी पाहुणे आले, लग्नात सकाळचा नाश्ता असो किंवा रोजचं हलकं खाणं कांदेपोहे हमखास केले जातात. पण अनेकदा कांदेपोहे बिघडतात. यामागचं एक मुख्य कारण म्हणजे कांदे आणि पोह्यांचं चुकीचं प्रमाण. मग प्रश्न असा पडतो कांदेपोहे करताना कांदे आणि पोह्यांचं नेमकं प्रमाण किती असायला हवं?
advertisement
2/5
बहुतेक वेळा आपण कांदा जास्त घातला तर चव चांगली येते, पोहे जास्त असतील तर मोकळे होतात असं वाटतं. पण खरंतर कांदे जास्त झाले की पोहे ओलसर होतात, कांद्याचा कच्चा वास राहतो आणि पोहे जास्त झाले की चव फिकी लागते, कांद्याची गोडी जाणवत नाही. म्हणूनच योग्य संतुलन अत्यंत महत्त्वाचं आहे. आयुर्वेदानुसार पोहे थंड, हलके आणि कांदासुद्धा थंड पण जड, कफवर्धक आहे. जर कांदा जास्त झाला तर कफ वाढतो, गॅस होतो, आळस आणि जडपणा जाणवतो म्हणून पोह्यांच्या तुलनेत अर्ध्या प्रमाणात कांदा हे संतुलन राखतं.
advertisement
3/5
वेगवेगळ्या प्रकारांसाठी वेगवेगळं प्रमाण आहे. घरगुती आणि हलके कांदेपोहे असतील तर 2 कप पोहे आणि 1 कप कांदा. म्हणजे पोह्यांच्या निम्म्या प्रमाणात रोजच्या नाश्त्यासाठी सर्वोत्तम प्रमाण. हे प्रमाण चव, टेक्चर आणि आणि पचन या तिन्ही दृष्टीने योग्य मानलं जातं. या प्रमाणामुळे पोहे मऊ पण चिकट होत नाहीत, कांद्याची गोड चव परफेक्ट राहते, पोहे हलके आणि पचायला सोपे राहतात
advertisement
4/5
स्ट्रीट स्टाईल किंवा इंदुरी पोहे बनवायचे असतील तर 2 कप पोहे आणि सव्वा कप किंवा दीड कप कांदा. यामुळे पोहे चविष्ट होतात पण ते जड असल्याने रोज खाण्यासाठी योग्य नाही. पचनाचा विचार करता 2 कप पोहे आणि पाऊण कप कांदा हे प्रमाण योग्य आहे.
advertisement
5/5
फक्त प्रमाण नाही, कांदा कसा वापरतो तेही महत्त्वाचं आहे. योग्य प्रमाण असूनही पोहे चुकतात कारण: कांदा जाड चिरलेला असतो, कच्चा कांदा तसाच घातला जातो. पोह्यांमध्ये कांदा घालण्याची योग्य पद्धत म्हणजे कांदा बारीक चिरलेला असावा, त्यावर थोडं मीठ लावून मऊ करावा, फोडणीत हलका परतवलेला कांदा वापरावा यामुळे कमी कांदा असूनही चव अधिक चांगली लागते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Kandepohe : परफेक्ट कांदेपोह्यांसाठी पोहे आणि कांद्याचं प्रमाण किती असावं?