Weather Alert : महाराष्ट्रावर अवकाळी संकट, वादळी वाऱ्यासह बुधवारी पाऊस कोसळणार, 24 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळाली होती. 18 मार्च रोजी राज्यातील 24 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/7

महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यात उष्णतेची लाट पहायला मिळाली होती. 18 मार्च रोजी राज्यातील 24 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत हवामान कसे राहील पाहूयात.
advertisement
2/7
कोकण विभागातील मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहील. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल. मुंबईत कमाल तापमान 32-36 अंश सेल्सियस तर किमान 24-27 अंश राहील. आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल.
advertisement
3/7
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. पुण्यात कमाल तापमान 33-36 अंश तर किमान 18-21 अंश राहील.
advertisement
4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर अहिल्यानगराला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट असेल. नाशिकमध्ये कमाल तापमान 32-35 अंश तर किमान 19-22 अंश राहील.
advertisement
5/7
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्याने हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. नांदेड, परभणी, धाराशिव, हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना बुधवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 33-36 अंश राहील.
advertisement
6/7
विदर्भातील नागपूर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा आणि वर्ध्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. नागपूरमध्ये कमाल तापमान 34-38 अंश तर किमान 21-24 अंश राहील.
advertisement
7/7
एकंदरीत, 18 मार्चला महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीला आलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी. तसेच नागरिकांनी देखील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घ्यावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/पुणे/
Weather Alert : महाराष्ट्रावर अवकाळी संकट, वादळी वाऱ्यासह बुधवारी पाऊस कोसळणार, 24 जिल्ह्यांना अलर्ट