TRENDING:

गरे खाऊन बिया फेकू नका, त्यांची भाजी मटणापेक्षा लागते भारी! डायबिटीजवर रामबाण

Last Updated:
आहारात फळांचा समावेश असायलाच हवा, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. विशेषतः हंगामी फळं खाणं आरोग्यासाठी उपयुक्त असतं. काही फळांचा फक्त गर आणि रसच नाही, तर बीसुद्धा फायदेशीर असते. या बियांमुळे आपलं संपूर्ण आरोग्य सुदृढ राहू शकतं. (सनंदन उपाध्याय, प्रतिनिधी)
advertisement
1/5
गरे खाऊन बिया फेकू नका, त्यांची भाजी मटणापेक्षा लागते भारी! डायबिटीजवर रामबाण
फणस बाहेरून कितीही टणक असला, त्यातले गरे काढणं कितीही अवघड असलं तरी हे गरे अनेकजण आवडीने खातात. बहुतेकजण गऱ्यांच्या आतली बी फेकून देतात, तर काहीजण ती भाजून खातात. परंतु ही बी अनेक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असते हे तुम्हाला माहितीये का?
advertisement
2/5
गऱ्यांच्या बियांची भाजी एवढी स्वादिष्ट लागते की तिच्यासमोर पनीर आणि मटणही फिके पडतील. त्यामुळे अनेकजण अगदी बोटं चाटत ही भाजी खातात. आयुर्वेदिक डॉक्टर प्रियंका सिंह सांगतात की, गऱ्यांच्या बिया पचनसंस्था, हाडांबाबत समस्या, शरिरातली रक्ताची कमतरता, तणाव, ब्लड शुगर इत्यादींवर उपयुक्त असतात. शिवाय या बियांमुळे शरिराला ऊर्जाही मिळते.
advertisement
3/5
फणसाच्या बियांमध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, झिंक, आयर्न, कॅल्शियम, इत्यादी अनेक पोषक तत्त्व भरभरून असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
advertisement
4/5
फणसाच्या बियांची भाजी बनवण्याआधी या बिया आगीवर भाजून, पाण्यात व्यवस्थित शिजवाव्या. नंतर त्याची अत्यंत स्वादिष्ट भाजी तयार होईल. नॉनव्हेज डिशलासुद्धा ही भाजी तोड देते.
advertisement
5/5
लक्षात घ्या, फणसाची बी कधीच कच्ची खाऊ नये. शिवाय या बिया प्रमाणापेक्षा जास्त <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/mango-pickle-benefits-eat-homemade-mango-pickle-for-boosting-immunity-and-digestion-mhpj-1188667.html">खाल्ल्यास</a> पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसंच तुम्हाला कोणता <a href="https://news18marathi.com/lifestyle/turmeric-water-bath-benefits-take-bath-with-turmeric-water-increase-face-glow-and-immunity-mhpj-1188509.html">आजार</a> असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच या बिया <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/mango-peels-uses-use-mango-peels-these-5-ways-you-will-get-tremendous-benefits-mhpj-1188680.html">खाव्या</a>. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
गरे खाऊन बिया फेकू नका, त्यांची भाजी मटणापेक्षा लागते भारी! डायबिटीजवर रामबाण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल