अस्सल पारंपरिक जेवणासाठी प्रसिद्ध, 90 वर्षांपासून जपलीय परंपरा, पुण्यातील हे ठिकाण माहितीये का?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुण्यातील न्यू पूना गेस्ट हाऊस हे तब्बल 90 वर्ष जुनं हॉटेल आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे न्यू पूना गेस्ट हाऊस आपल्या पारंपरिक जेवणासाठी प्रसिद्ध आहे.
advertisement
1/7

पुण्यात अनेक प्रसिद्ध असे खवय्यांसाठी ठिकाण आहेत. पुण्यातील न्यू पूना गेस्ट हाऊस हे तब्बल 90 वर्ष जुनं हॉटेल आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे न्यू पूना गेस्ट हाऊस आपल्या पारंपरिक जेवणासाठी प्रसिद्ध आहे.
advertisement
2/7
अनेक नामवंत व्यक्ती, साहित्यिक, कलाकार आणि राजकारणी आजही येथे आवर्जून येतात. न्यू पूना गेस्ट हाऊस म्हणजे फक्त हॉटेल नाही, तर पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे.
advertisement
3/7
पुण्यातील तुळशीबाग मार्केट आणि बुधवार पेठ इथे असलेलं न्यू पूना गेस्ट हाऊस हे 90 वर्ष जुनं असून 1935 मध्ये याची सुरुवात झाली होती. इथे पारंपारिक पदार्थ बनवले जातात. न्यू पूना गेस्ट हाऊसची सुरुवात 1935 साली नानासाहेब सरपोतदारांनी केली.
advertisement
4/7
ते कोकणातून मूक चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुण्यात येऊन सारसबागेजवळ आर्यन फिल्म कंपनी सुरू करून 49 मूकचित्रपटांची निर्मिती केली. परंतु चित्रपटसृष्टीतील अस्थिरता लक्षात घेता स्वतःच्या कुटुंबासाठी एक आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा यासाठी न्यू पूना गेस्ट हाऊसची निर्मिती केली. आता त्यांची चौथी पिढी हा व्यवसाय चालवते आहे.
advertisement
5/7
न्यू पूना गेस्ट हाऊसला 90 वर्ष पूर्ण झाले असून खास करून महाराष्ट्रीयन जेवण हे तयार केले जाते. यामध्ये दडपे पोहे, थालीपीठ, मिसळ हे पूर्वीपासून करत असून पारंपारिक वेगवेगळ्या प्रकारच्या थाळ्या या देत असतो.
advertisement
6/7
स्पेशल थाळीमध्ये मसालेभात, आळू भाजी, बटाटा भाजी, गोड असतं तर ग्रामीण थाळीमध्ये पालेभाज्या, भाकरी, पिठलं हे देत असतो. हे खाण्यासाठी अनेक नामवंत लोक आजही येतात.
advertisement
7/7
यामध्ये मराठी अभिनेते आणि राजकीय लोक देखील आहेत. हे खाण्यासाठी लोकांची कायम गर्दी असते, अशी माहिती शर्मिला सरपोतदार यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
अस्सल पारंपरिक जेवणासाठी प्रसिद्ध, 90 वर्षांपासून जपलीय परंपरा, पुण्यातील हे ठिकाण माहितीये का?