Watermelon: लालभडक रंगाला भुलू नका! इंजेक्शन दिलेलं कलिंगड करेल घात, लक्षात ठेवा या ट्रिक्स!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Watermelon Tips: उन्हाळ्यात अनेकजण लालभडक बघून कलिंगड विकत घेतात. परंतु, हाच रंग आपला घात करू शकतो. कलिंगड खरेदी करताना या टिप्स लक्षात ठेवा.
advertisement
1/7

उन्ह तापलेलं असताना लालभडक कलिंगड खायला कुणालाही आवडतं. पण या चकचकीत लाल रंगाच्या जाळ्यात अडकण्याआधी योग्य तपासणी करणे आवश्यक आहे. कारण सध्याच्या बाजारात काही व्यापारी कलिंगड अधिक आकर्षक दिसण्यासाठी कृत्रिम रंग व रसायनांचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.
advertisement
2/7
मायन किंवा इतर घातक रसायनांच्या सहाय्याने कलिंगडाचा रंग वाढवला जातो. काही वेळा इंजेक्शनद्वारे कलिंगडांना कृत्रिम रंग दिला जातो, त्यामुळे नैसर्गिक गोडव्याचा नाश होतो आणि अन्न विषबाधा, पचनसंस्थेच्या तक्रारींसह गंभीर आरोग्यविषयक धोके वाढतात.
advertisement
3/7
उन्हाळ्यात कलिंगडाच्या खरेदी करण्यापूर्वी नैसर्गिक रंगाचं आणि चांगलं कलिंगड ओळखता येणं गरजेचं आहे. अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते. याबाबतच मुंबईतील आहारतज्ज्ञ अमृता उत्तरावर बोनगीरवर यांनी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.
advertisement
4/7
फळाचा तळभाग तपासा: जमिनीला टेकलेला भाग नैसर्गिकरित्या किंचित पिवळसर असतो. संपूर्ण कलिंगड एकसंध रंगाचे असल्यास, ते कृत्रिमरित्या पिकवलेले असण्याची शक्यता असते.
advertisement
5/7
पाण्यात टाका: कलिंगडाचा लहानसा तुकडा पाण्यात टाका. जर पाणी गुलाबी झालं, तर कलिंगडाला कृत्रिम रंग लावलेला असतो.
advertisement
6/7
नैसर्गिक कलिंगडाच्या बिया तपकिरी आणि कळ्या रंगाच्या असतात. तसंच कलिंगड आतून लालसर असतेच पण ते कृत्रिम वाटत नाही. कृत्रिम कलिंगडच्या बिया ह्या पांढऱ्या रंगाच्या असतात व आतून गडद लालसर दिसते. काही वेळा रंग हाताला लागण्याची शक्यता असते.
advertisement
7/7
लालसर, रसाळ कलिंगड मोहक दिसले तरीही, त्यामागील संभाव्य धोके ओळखणे गरजेचे आहे. सुरक्षित आणि नैसर्गिक फळांची निवड करा. आरोग्यास प्राधान्य द्या, असंही आहारतज्ज्ञ अमृता उत्तरावर बोनगीरवर सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Watermelon: लालभडक रंगाला भुलू नका! इंजेक्शन दिलेलं कलिंगड करेल घात, लक्षात ठेवा या ट्रिक्स!