TRENDING:

Famous Food: 20 रुपयामध्ये पोटभर खा! अस्सल सोलापुरी दालचा राईस, पिंपरी-चिंचवडमधील ठिकाण माहितीये का?

Last Updated:
Pune Food: अस्सल सोलापुरी दालचा आता फक्त 20 रुपयांत पिंपरी-चिंचवडकरांना खायला मिळतोय. गेल्या 3 वर्षांपासून आकुर्डीत दालचा राईस खाण्यासाठी मोठी गर्दी असते.
advertisement
1/5
20 रुपयामध्ये पोटभर खा!सोलापुरी दालचा राईस,पिंपरी-चिंचवडमधील ठिकाण माहितीये का?
प्रत्येक शहराची वेगळी अशी खाद्यसंस्कृती असते. सोलापूर म्हटलं की अनेकांना अगदी स्वस्तात पोटभर मिळणारा दालचा आठवतो. आता हीच अस्सल सोलापुरी चव पुण्यात मिळतेय.
advertisement
2/5
आकुर्डीतील ‘फॅमिली दालचा राईस’ या स्टॉलवर दररोज शेकडो खवय्ये फक्त 20 रुपयांत चविष्ट, पोटभर आणि खास सोलापुरी ‘दालचा राईस’ खाण्यासाठी गर्दी करत आहेत. इरफान मुल्ला यांनी 2022 मध्ये हा स्टॉल सुरू केला असून याबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
3/5
इरफान मुल्ला यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये आकुर्डीतील साने चौक येथे 'फॅमिली दालच्या राइस' या नावाने एक छोटासा ढाबा सुरू केला. सुरुवातीपासूनच त्यांनी ठरवलं होतं की हे जेवण सर्वसामान्यांना परवडणारं असावं.
advertisement
4/5
त्यामुळे दालच्या राइसची किंमत त्यांनी केवळ 20 रुपये ठेवली आणि विशेष म्हणजे गेली तीन वर्ष ही किंमत त्यांनी बदललेली नाही .या ठिकाणी मिळणारा दालचा राइस हा खास सोलापुरी पद्धीतनं तयार केला जातो. त्यामुळे खवय्यांना आवडतो, असं मुल्ला सांगतात.
advertisement
5/5
“दिवसभर कष्ट करणाऱ्या लोकांना पोटभर, चविष्ट आणि परवडणारं जेवण मिळावं, एवढीच माझी मनापासून इच्छा आहे,” असं इरफान सांगतात. ही सामाजिक जाण लक्षात घेऊन त्यांनी आकुर्डी परिसरात सुरू केलेला ‘फॅमिली दालचा राईस’ स्टॉल आज चविष्ट आणि परवडणाऱ्या जेवणासाठी ओळखला जातो. साधेपणा, सेवाभाव आणि खास चव यांच्या जोरावर इरफान यांचा छोटासा स्टॉल अनेकांच्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग बनलाय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Famous Food: 20 रुपयामध्ये पोटभर खा! अस्सल सोलापुरी दालचा राईस, पिंपरी-चिंचवडमधील ठिकाण माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल