सोलापुरातील प्रसिद्ध पेढा, खाण्यासाठी असते मोठे गर्दी, काही तासातच संपतात पेढे
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
सोलापुरातही असंच एक ठिकाण असून या ठिकाणी पेढा खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते. सोलापूर जिल्ह्यातील मुस्ती गावात 59 वर्षीय सुरेश वाकडे यांच्या हातचा पेढा खाण्यासाठी दूरून लोक येत असतात.
advertisement
1/7

प्रत्येक शहरात काही ना काही प्रसिद्ध पदार्थ मिळत असतात. त्या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. सोलापुरातही असंच एक ठिकाण असून या ठिकाणी पेढा खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते. सोलापूर जिल्ह्यातील मुस्ती गावात 59 वर्षीय सुरेश वाकडे यांच्या हातचा पेढा खाण्यासाठी दूरून लोक येत असतात.
advertisement
2/7
59 वर्षीय सुरेश वाकडे हे 1995 पासून गावातच बसवेश्वर या नावाने पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेल चालवतात. त्यांच्या हॉटेलमधील पेढा चांगलाच फेमस झाला आहे. ते दररोज 35-40 लिटर दुधाचा पेढा बनवतात. पण काही तासातच हा पेढा संपतो, असं सुरेश सांगतात.
advertisement
3/7
या ठिकाणी रोज म्हशीचे 35 ते 40 लिटर दूध आणून हॉटेलमध्ये पेढा बनवला जातो. दुधाला जवळपास तीन ते चार तास उकळून त्यामध्ये साखर घातली जाते. जवळपास 35 ते 40 लिटर दुधापासून 7 ते 8 किलो पेढा तयार होतो. एका पेढ्याची किंमत 20 रुपये इतकी आहे. तर 400 रुपये किलो दराने हा पेढा विकला जातो.
advertisement
4/7
गावातील हॉटेलमधूनच सुरेश वाकडे यांनी तयार केलेले पेढे विकले जातात. मागणी चांगली असल्याने सकाळी 11 ते 12 वाजण्याच्या आतच पेढा संपून जातो.
advertisement
5/7
सर्व खर्च वजा करून महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत नफा सुरेश यांना पेढे विक्रीतून होतो. या व्यवसायातून त्यांना वर्षाला 3 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
advertisement
6/7
याचबरोबर त्यांच्या बसवेश्वर हॉटेलमध्ये चहा, चुरमुऱ्यांपासून बनवलेला चिवडा, कांदा भजी, मिरची भजी देखील खाण्यासाठी उपलब्ध आहे.
advertisement
7/7
या ठिकाणी हा पेढा खाण्यासाठी बोरामणी, कुंभारी, तांदूळवाडी, निलेगाव तसेच धाराशिव, तुळजापूर, लातूर, मुंबई, पुणे येथून सुद्धा ग्राहक येत असतात. लोकांना खाण्यासाठी दर्जेदार दर्जा दिला तर लोक आपल्याला शोधून येतात, असं ते सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
सोलापुरातील प्रसिद्ध पेढा, खाण्यासाठी असते मोठे गर्दी, काही तासातच संपतात पेढे