Girls Trip Plan : महिलांसाठी मुंबई-पुण्याजवळ फिरण्यासारखी खास ठिकाणं! मैत्रिणींसोबत सेलिब्रेट करा Women's Day
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Girls trip planning for women's day celebration : यंदाच्या महिला दिनासाठी तुमचा काही प्लॅन ठरलाय की नाही? नसेल ठरला तर या काही सुंदर ठिकाणी तुम्ही तुमच्या मैत्रिणींच्या ग्रुपसोबत जाऊ शकता. ही ठिकाणी पुणे आणि मुंबईच्या अगदी जवळ आहे. चला पाहूया ती ठिकाणं कोणती आहेत.
advertisement
1/7

घरासाठी आपण रोज व्यस्त असतो. पण महिला दिनाला आपण स्वतःसाठी वेळ काढूच शकतो, किंबहुना काढावा. या महिला दिनाला तुम्ही तुमच्या मैत्रिणींसोबत फिरायला जाऊ शकता. आम्ही तुम्हाला मुंबई- पुण्याजवळच्या काही खास ठिकाणं सांगणार आहोत जिथे तुम्ही ग्रुपने जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता.
advertisement
2/7
माथेरान : मुंबईच्या लोकांसाठी तर हा परफेक्ट विकेंड गेटवे आहे. पुण्याहूनही अनेक लोक इथे फिरायला येतात. इथे तुम्हाला राहण्याची हवी तशी सोपंय मिळते. तुम्ही निसर्गरम्य वातावरणात छान दिवस घालवू शकता. शिवाय हे ठिकाण फोटो काढण्यासाठीही बेस्ट आहे.
advertisement
3/7
पवना लेक : पावन लेक कॅंपिंगबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल. इथल्या शांत तलावाकाठी राहण्यासाठी किंवा कॅम्पिंगसाठी उत्तम सोया तुम्हाला मिळते. तुम्ही मैत्रिणींसोबत इथे कॅम्पिंग, डान्स, गाणी आणि वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता.
advertisement
4/7
लोणावळा आणि खंडाळा : इथे हिरवळ, धबधबे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिकेशनचा तुम्ही आनंद घेऊ शकता. मैत्रिणींसोबत एखादा वीला बुक करून तुम्ही इथे निवांत आणि मजेदार एक दिवस घालवू शकता.
advertisement
5/7
अलिबाग आणि काशीद : इथे तुम्ही मुंबईवरून फेरीनेही जाऊ शकता. हा मुंबई पुण्यातील लोकांचा आवडता समुद्र किनारा आहे. उपलब्ध असल्यास तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा देखील इथे आनंद घेऊ शकता. इथे कुलाबा किल्लासारखी ऐतिहासिक ठिकाणेदेखील आहेत.
advertisement
6/7
महाबळेश्वर आणि पाचगणी : ही ठिकाणंही लोकांना पाहायला खूप आवडतात. इथे तुम्ही मैत्रिणीसोबत निसर्गरम्य दृश्य, स्ट्रॉबेरी फार्म पाहू शकता. घरापेक्षा एखादा वेगळ्या ठिकाणी वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Girls Trip Plan : महिलांसाठी मुंबई-पुण्याजवळ फिरण्यासारखी खास ठिकाणं! मैत्रिणींसोबत सेलिब्रेट करा Women's Day