TRENDING:

Good Night Maharashtra : रात्री कधीही पोटभर जेवू नका, कारण समजलं तर आत्ताच कमी कराल अन्न

Last Updated:
Good Night Maharashtra : तुम्हाला माहितीय का की तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा किंवा पोटभर जेवणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
advertisement
1/7
रात्री कधीही पोटभर जेवू नका, कारण समजलं तर आत्ताच कमी कराल अन्न
हल्ली घरातील बहुतांश मंडळी ही कामासाठी दिवसभर घराबाहेर असतात. अशात दिवस संपूर्ण धावपळीचा जातो. त्यामुळे दिवसभर जेवायला किंवा काही खायला लोकांना वेळ मिळत नाही. अशावेळी बहुतांश लोक असा विचार करतात की रात्री घरी गेल्यानंतर रात्रीचं जेवण आम्ही आरामात आणि पोटभर जेऊ, जे चवीला ही उत्तर आणि चमचमीत असेल.
advertisement
2/7
पण तुम्हाला माहितीय का की तज्ज्ञांच्या मते, रात्री उशिरा किंवा पोटभर जेवणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. शरीराचा मेटाबॉलिझम रात्री मंदावतो, त्यामुळे उशिरा घेतलेले आणि जड अन्न पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे पचनाच्या समस्या, अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि झोपेची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता वाढते.
advertisement
3/7
‘जर्नल ऑफ क्लिनिकल स्लीप मेडिसिन’मधील संशोधनानुसार, झोपण्याच्या 2-3 तास आधी जड जेवण केल्यास पोटातील आम्ल वर येण्याची समस्या (Acid Reflux) वाढते. पचन नीट न झाल्याने गॅस, फुगलेपणा आणि पोटदुखी होऊ शकते. लठ्ठपणा वाढणे, ब्लड शुगर लेव्हल बिघडणे आणि हृदयविकाराचा धोका यासारखे परिणामही दिसून येतात.
advertisement
4/7
वजन आणि हार्मोन्सवर परिणामहार्वर्ड मेडिकल स्कूलच्या तज्ज्ञांच्या मते, उशिरा जेवल्यास शरीरातील ‘इन्सुलिन’ आणि ‘लेप्टिन’ सारख्या हार्मोन्सची पातळी बिघडते, ज्याचा थेट परिणाम चरबी साठण्यावर होतो. सतत अशी सवय राहिल्यास लठ्ठपणासोबतच डायबेटीसचा धोका वाढतो.
advertisement
5/7
काय करावे?रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान 2-3 तास आधी घ्या.हलके, कमी तेलकट आणि संतुलित अन्न निवडा.जेवल्यानंतर थोडा फेरफटका मारा.पोटभर न खाता 70-80% पोट भरल्यावर थांबा.
advertisement
6/7
रात्रीचे जेवण फक्त पोट भरण्यासाठी नसून शरीराला आवश्यक पोषण देण्यासाठी असते. सवयीत थोडा बदल केल्यास पचन सुधारते, झोप चांगली लागते आणि दीर्घकालीन आरोग्य चांगले राहते.
advertisement
7/7
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Good Night Maharashtra : रात्री कधीही पोटभर जेवू नका, कारण समजलं तर आत्ताच कमी कराल अन्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल