TRENDING:

फोटोसाठी हात कापला, मग त्याच रक्ताने काढलं चित्र; राधा पाटीलने सांगितला पुण्यातील फॅनचा खतरनाक अनुभव

Last Updated:
Radha Patil : डान्सर राधा पाटिल सध्या बिग बॉस मराठी 6 च्या घरात आहे. राधा पाटिलने पुण्यातील तिच्या फॅनचा एक धक्कादायक अनुभव सांगितला.
advertisement
1/9
राधा पाटिल : फोटोसाठी फॅनने स्वत:चा हात कापला, मग त्याच रक्ताने काढलं चित्र
लोकप्रिय डान्सर आणि परफॉर्मर राधा पाटिलच्या शोला चाहत्यांची प्रचंड गर्दी असते. राधाच्या शो चाहत्यांची मोठी गर्दी असते. राधाचीही महाराष्ट्रात मोठी क्रेझ आहे.
advertisement
2/9
राधा सध्या बिग बॉस मराठी 6 मध्ये सहभागी झाली आहे. घरात गेल्यानंतर राधाच्या आयुष्यातील अनेक गोष्टी समोर येत आहेत. दरम्यान एका मुलाखतीत बोलताना राधाने तिच्या एका फॅनचा खतरनाक किस्सा सांगितला होता. 
advertisement
3/9
राधा पाटिलने सांगितलं की, पुण्यात एका शो दरम्यान एका चाहत्यानं तिच्याबरोबर फोटो काढायला न मिळाल्याने हात कापून घेतला. मग त्याच रक्ताने त्याने राधाचं चित्र काढून तिला गिफ्ट केलं. 
advertisement
4/9
राधा म्हणाली, "पुण्याला माझा शो होता आणि तिथे एका फॅनने मी फोटो दिला नाही म्हणून हात कापून घेतला होता. तिथे खूप गर्दी होती. त्यामुळे मला त्याच्यापर्यंत आणि त्याला माझ्यापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं".
advertisement
5/9
"त्याने मला व्हॅनिटीमधून हात दाखवला. त्याच्या हातात चावी का काहीतरी होती. त्यानेच त्याच्या हातावर पूर्ण कट मारला, त्याच्या हातातून रक्त येत होत, मी पाहिलं, मला खूप भीती वाटायला लागली होती".
advertisement
6/9
"ते पाहून मी बाउन्सरला सांगितलं की त्याने हात कापून घेतलाय. मला त्याचं रक्त दिसतंय. मग त्याला बाजूला घेऊन आम्ही पट्टी वगैरे लावली. त्याला आम्ही समजावलं की असं नको करूस."
advertisement
7/9
"त्यानंतर मग मी त्याला फोटो दिला. त्याने त्याच्या रक्ताने माझं पेटिंग काढून आणलं होतं. ते मी आजही माझ्या घरात लावलं आहे". राधा पाटिलचा हा थरारक किस्सा ऐकून तिचे चाहतेही शॉक झालेत. 
advertisement
8/9
राधा पाटिलने बिग बॉसच्या घरात तिच्या प्रेमाची कबूली दिली. राधा पाटिल एका गायकाला डेट करत असून दोघे मागील 3 वर्षांपासून लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. 
advertisement
9/9
राधाचा 2 बीएचके फ्लॅट असून दोघांसाठी वेगळी बेडरूमही आहे. राधाचं तिच्या बॉयफ्रेंडवर खूप प्रेम आहे. बिग बॉसच्या घरात त्याची आठवण आली की तिला रडू येतं असं तिने सांगितलं. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फोटोसाठी हात कापला, मग त्याच रक्ताने काढलं चित्र; राधा पाटीलने सांगितला पुण्यातील फॅनचा खतरनाक अनुभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल