TRENDING:

Benefits of Green Chilli : हिरव्या मिरचीचे फायदे अफाट, 5 आजारांपासून मिळेल मुक्ती

Last Updated:
बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सध्या माणसाला अनेक आजाराची लागण होऊ लागली आहे. मधुमेहापासून ते हृदयरोगासारखे गंभीर आजार विशीतल्या तरुणांना देखील होऊ लागले आहेत. मिरची ही पदार्थांची चव वाढवण्यासाठी त्यात तिखटपणा येण्यासाठी वापरली जाते. परंतु त्याचे शरीराला देखील अनेक फायदे आहेत.
advertisement
1/5
हिरव्या मिरचीचे फायदे अफाट, 5 आजारांपासून मिळेल मुक्ती
हिरव्या मिरचीचे सेवन हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मिरचीचे सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. हिरवी मिरची ट्रायग्लिसराईड नियंत्रित करण्यातही मदत करते. ज्यामुळे एथेरोस्लोरोसिस सारख्या आजारांचा धोका कमी होतो.
advertisement
2/5
हिरवी मिरची ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. दिवसभरात एक मिरची खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. हिरव्या मिरचीत आढळणारे कॅप्सेसिन हे अँटिबायोटिक म्हणून काम करते.
advertisement
3/5
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हिरवी मिरची फायदेशीर ठरते. हिरव्या मिरचीमध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण आढळते जे एक विशेष प्रकारचे अँटीऑक्सिडंट आहे.
advertisement
4/5
शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हिरव्या मिरचीचे सेवन केले जाऊ शकते. परंतु त्याचवेळी लाल मिरचीचे सेवन आहारातून कमी करावे.
advertisement
5/5
हिरव्या मिरचीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरिअल गुण मुरूम आणि इतर समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Benefits of Green Chilli : हिरव्या मिरचीचे फायदे अफाट, 5 आजारांपासून मिळेल मुक्ती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल