TRENDING:

Red Guava Health Benefits: लाल पेरूचे 'हे' फायदे माहिती आहेत ? हिवाळ्यात खाल्ल्याने पडणार नाही आजारी

Last Updated:
Red Guava Health Benefits: बाहेरून दिसायला हिरवागार आणि आतून गोड अशी पेरूची ओळख. मोठ्या शहरांमध्ये आत्तापर्यंत आतून पांढरा असणारा पेरू सर्वसामान्यपणे विकला जात होता. मात्र आता लाल रंगाचा पेरूही बाजारात उपलब्ध आहे. पेरूचा लाल रंग हा लाइकोपीन नावाच्या रंगद्रव्यामुळे होतो, जे एक प्रकारचं कॅरोटीनॉइड आहे. जाणून घेऊयात हिवाळ्यात लाल पेरू खाण्याचे फायदे.
advertisement
1/7
Red Guava Health Benefits: लाल पेरूचे ‘हे’ फायदे माहिती आहेत?
लाल पेरूत फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे पचन सुधारून बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसेस सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
advertisement
2/7
लाल पेरूत व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं ज्यामुळे मुक्त रॅडिकल्सपासून शरीराचा बचाव होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.
advertisement
3/7
लाल पेरूत पोटॅशिअम,अँटिऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. लाल पेरू खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहायाला मदत होते. यामुळे हृदयाचं आरोग्यही सुधारतं.
advertisement
4/7
लाल पेरूतले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए त्वचेला कोमल आणि तजेलदार बनवतात.
advertisement
5/7
लाल पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्यामुळे पेरू खाल्ल्यानंतर रक्तात हळूहळू साखर विरघळते. त्यामुळे पेरू हे फळ डायबिटीस असलेल्या रूग्णांसाठी फायद्याचं ठरतं.
advertisement
6/7
लाल पेरूत कॅलरीज कमी आणि फायबर्स जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे पोट भरलेलं राहून भूक कमी लागते. याशिवाय पेरूतले फायबर्स अन्न पचायला मदत करतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहायला मदत होते.
advertisement
7/7
लाल पेरूत आढळून येणारं व्हिटॅमिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायद्याचं ठरतं. त्यामुळ दृष्टीदोष कमी होऊन नजर सुधारायला मदत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Red Guava Health Benefits: लाल पेरूचे 'हे' फायदे माहिती आहेत ? हिवाळ्यात खाल्ल्याने पडणार नाही आजारी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल