TRENDING:

Gudi Padwa Rangoli: पाडव्यासाठी रांगोळी डिझाईनचा विचार करताय? हे आहेत सोपे आणि बेस्ट पर्याय!

Last Updated:
Gudi padwa rangoli designs: कोणताही भारतीय सण रांगोळी शिवाय अधुरेच आहेत. सणावाराला दारात सुंदर रांगोळी हवीच. यंदा गुढी पाडव्याला दारात किंवा गुढी भोवती काढता येतील अशा रांगोळी डिझाईन्स पाहूयात.
advertisement
1/5
Gudi Padwa Rangoli: पाडव्यासाठी रांगोळी डिझाईनचा विचार करताय? हे बेस्ट पर्याय!
गुढी पाडव्याच्या दिवसापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. नववर्ष उत्तम, आरोग्यदायी आणि सुख-समृद्धीने जावे यासाठी आपण उंच गुढी उभारतो. त्या गुढीला फुलांनी, साखरेची माळ, कडुनिंबाच्या पानांनी सजवतो. आपल्या घराला फुलांच्या माळा लावून, अंगणात सुंदर रंगसंगतीचा वापर करून रांगोळी काढली जाते.
advertisement
2/5
गुढीपाडवा म्हटलं की नवीन वर्षाचा पहिला सण. या दिवशी सगळेजण आनंदाने गुढी उभारतात आणि नवीन वर्ष सुखासमाधाचं आनंदाने जावं यासाठी प्रार्थना करतात. भारतीय संस्कृतीत कायम सण आणि उत्सवांना अधिक महत्त्व असतं. काही साध्या गोष्टीचा वापर करून तुम्ही रांगोळी काढू शकता.
advertisement
3/5
गुढीपाडव्याच्या दिवशी घरात गोडाधोडाचा स्वंयपाक बनवला जातो. अशावेळी कामाच्या गडबडीत रांगोळ्या काढायाला फारसा वेळ मिळत नाही. दारासमोर 5 ते 10 मिनिटांत काढता येतील अशा सोप्या रांगोळी डिजाईन्स आहेत.
advertisement
4/5
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन साडी, आंब्याची पाने, असे तांब्या घालतात. तुम्ही ही डिझाईनची रांगोळी तुमच्या घराबाहेरही काढू शकता. संस्कार भारती रांगोळी काढणंसुद्धा उत्तम पर्याय आहे. संस्कार भारती रांगोळीसाठी तुम्हाला जास्तवेळ द्यावा लागेल. पण काही सोप्या टिप्स वापरून काही मिनिटाच तुम्ही ही रांगोळी काढू शकता.
advertisement
5/5
रांगोळी सजवण्यासाठी तुम्ही दिव्याचा वापर करू शकता. यामुळे रांगोळी सुंदर दिसू शकते. रेडिमेड रांगोळी देखील तुम्हाला मिळू शकतात. यामुळे काही क्षणातच तुमचे काम होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Gudi Padwa Rangoli: पाडव्यासाठी रांगोळी डिझाईनचा विचार करताय? हे आहेत सोपे आणि बेस्ट पर्याय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल