Health Tips : पेरू खाल्ल्यानंतर चुकूनही हे 5 पदार्थ खाऊ नका, नाहीतर पोटदुखीसह होतील 'हे' त्रास
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
सर्वच फळं तशी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. फक्त काही फळं काही त्रास असलेल्या लोकांना चालत नाहीत. तसेच काही फळं खाल्ल्यानंतर दुसरे पदार्थ खाणे वर्ज्य असते. असेच एक फळ आहे, पेरू. पेरू आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. पण पेरू खाल्ल्यानंतर लगेच काही गोष्टी खाणे टाळावे. चला पाहूया ते पदार्थ कोणते आहेत.
advertisement
1/4

केळी : पेरू खाल्ल्यानंतर केळी खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात. पेरू हे आम्लयुक्त pH असलेले फळ असून केळी गोड असते. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही हे दोन्ही एकत्र खाता तेव्हा गॅस, डोकेदुखी आणि पोटाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात.
advertisement
2/4
दूध : पेरू खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने तुमच्या शरीरातील अनेक समस्या वाढू शकतात. ते प्रथम व्हिटॅमिन सीवर प्रतिक्रिया देते आणि नंतर तुमची पचन प्रक्रिया मंदावते. यामुळे तुम्हाला पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील होऊ शकते.
advertisement
3/4
दही : आयुर्वेदाचार्यांच्या मते, पेरूसोबत किंवा लगेच दही खाणे टाळावे. असे केल्याने तुमच्या पोटात सर्दी होण्याचा धोका वाढू शकतो. याशिवाय तुम्हाला उलट्याही होऊ शकतात.
advertisement
4/4
ताक : पेरू खाल्ल्यानंतर ताक घेतल्याने दीर्घकाळ ॲसिडिटी होऊ शकते. यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते आणि आम्लपित्त आणि पोटदुखी होऊ शकते. तसेच यामुळे पोटात गॅस होऊन मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : पेरू खाल्ल्यानंतर चुकूनही हे 5 पदार्थ खाऊ नका, नाहीतर पोटदुखीसह होतील 'हे' त्रास