दुधासोबत चुकूनही खाऊ नका या 5 गोष्टी, आरोग्याला निर्माण होऊ शकतो धोका, वाचा डॉक्टरांचा सल्ला
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
आहारशास्त्रात दूध हे अत्यंत आरोग्यदायी मानलं जातं. दुधात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि फॅट असतं. त्यामुळं लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, दुधासोबत काही गोष्टी मिक्स करणं किंवा खाणं धोकादायक ठरू शकतं. याबाबत 'डायट टू नरिश'च्या सहसंस्थापक आणि आहारतज्ज्ञ प्रियांका जयस्वाल यांनी माहिती दिलीय.
advertisement
1/7

दूध हे पचायला जड आहे. त्यामुळे ज्यांना पोटाशी संबंधित समस्या असतील, त्यांनी शक्यतो दूध खाणं टाळावं. दूध पिताना त्यासोबत इतर पदार्थ घेऊ नयेत. तसेच पिण्यापूर्वी ते उकळून घ्यावे. गाय किंवा म्हशीचे दूध तुम्हाला पचत नसेल तर शेळीचे दूध ट्राय करू शकता, असं प्रियांका सांगतात. तसेच दुधासोबत मांसाहारासह 5 गोष्टी घेणं हानिकारक ठरू शकतं, असा सल्लाही त्या देतात.
advertisement
2/7
कोणत्याही मांसाहारी पदार्थाचं सेवन दुधासोबत करणं तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. मासे खाल्ल्यास ते अधिक धोकादायक आहे. यामुळे तुमचा वात आणि पित्त असंतुलित होतं. तुम्हाला पचन आणि त्वचेशी संबंधित समस्या देखील जाणवू शकतात.
advertisement
3/7
दुधासोबत लिंबूवर्गीय फळेही आरोग्यास हानिकारक ठरतात. त्यामुळे मोसंबी, लिंबू, हिरवे सफरचंद, चिंच, पीच, आवळा, अननस आदी लिंबूवर्गीय फळांचं सेवन दुधासोबत करू नये. असं केल्यानं तुम्हाला पचनाच्या अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. याशिवाय सर्दी, खोकला, पुरळ, ॲलर्जीही होऊ शकते.
advertisement
4/7
अनेकांना दूध आणि केळीचं शिकरण खायला आवडतं आणि ते आरोग्यदायी मानतात. परंतु, आहारतज्ज्ञ याला सहमत नाहीत. त्यांच्या मते दूध आणि केळी एकत्र घेतल्याने आहार जड होतो आणि पचनास खूप वेळ लागतो. हे दोन्ही एकत्र घेतल्यास थकवाही जाणवू शकतो. त्यामुळे दूध आणि केळी वेगवेगळं घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
advertisement
5/7
आयुर्वेदात दूध आणि मीठ हे एकमेकांचे शत्रू मानले गेले आहेत. आयुर्वेदानुसार मीठ दुधाला विषारी बनवतं. तसेच ते शरीरात विरघळून त्वचारोगांना जन्म देतं. त्यामुळे खारट पदार्थ दुधासोबत किंवा रात्री जेवल्यानंतर लगेच खाऊ नयेत. जर तुम्ही मीठ खाल्लं असेल तर साधारण 2 तासांनी दुधाचं सेवन करावं.
advertisement
6/7
काही लोक हिवाळ्यात गुळाचा चहा पिण्याला प्राधान्य देतात. तर काहीजण दुधात साखरेच्या ऐवजी गूळ घालणं फायदेशीर मानतात. पण आयुर्वेदात दूध आणि गुळाचं मिश्रण घातक मानलं आहे. यामुळे पित्त आणि कफ दोष वाढतो, जो अनेक आजारांचं कारण आहे. अशावेळी गुळाऐवजी खडीसाखर वापरू शकता.
advertisement
7/7
सूचना: या बातमीत दिलेले आरोग्यविषयक सल्ले तज्ज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहेत. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरावी. अशा कोणत्याही वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही हानीसाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
दुधासोबत चुकूनही खाऊ नका या 5 गोष्टी, आरोग्याला निर्माण होऊ शकतो धोका, वाचा डॉक्टरांचा सल्ला