TRENDING:

133 प्रवाशांना वाटलं की सगळं संपलं, लॅण्डिंगदरम्यान चाक निखळलं, Air India च्या विमानासोबत कुठे झाला अपघात?

Last Updated:
हैदराबादहून थायलंडला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला लँडिंग दरम्यान नोज व्हील निकामी झाल्याने अपघात होता होता टळला. सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढले. फुकेत विमानतळावरील सेवा विस्कळीत.
advertisement
1/7
Air India: 133 प्रवाशांना वाटलं की सगळं संपलं, लॅण्डिंगदरम्यान चाक निखळलं
१३३ प्रवासी कुठे फिरायला निघालं तर कुणी कामासाठी चालले होते, मात्र पुढच्याच क्षणात असं काही घडलं की प्रवाशांचा श्वास रोखला. वाटलं एका क्षणात आता सगळंच संपलं. आजूबाजूला धूर दिसू लागला. काहीच कळेना आणि अख्खं विमान हादरलं. विमानाचं चाकच निखळलं होतं. एअर इंडियाच्या एक्सप्रेस विमानाचा हा भीषण आणि मोठा अपघात होता होता थोडक्यात टळला होता.
advertisement
2/7
हैदराबादहून थायलंडला गेलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला लँडिंग दरम्यान मोठा तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. विमानाचे नोज व्हील निकामी झाल्याने थोडक्यात अपघात होता होता टळला.
advertisement
3/7
खबरदारीचा उपाय म्हणून फुकेत विमानतळावरील सर्व विमान उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसचे फ्लाइट क्रमांक IX 938 ने बुधवारी सकाळी ६:४२ वाजता हैदराबादहून उड्डाण केलं होते. नियोजित वेळेनुसार हे विमान स्थानिक वेळेनुसार सकाळी ११:४० वाजता फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं.
advertisement
4/7
मात्र, लँडिंगच्या वेळी विमानाचा नोज व्हीलचा भाग खराब झाल्याने वैमानिकांना विमान पुढे नेणे कठीण झाले. हा विमानाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो, ज्याच्या मदतीने धावपट्टीवर विमान नियंत्रित केले जाते.
advertisement
5/7
विमान रनवेवर अडकल्यामुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते. मात्र, एअर इंडिया एक्सप्रेसने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "विमान कर्मचाऱ्यांनी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप विमानाबाहेर उतरवण्यात आले आहे."
advertisement
6/7
या बोईंग ७३७-मॅक्स ८ विमानामध्ये नक्की किती प्रवासी होते, याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. विमान थेट धावपट्टीच्या मधोमध अडकल्यामुळे इतर विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे.
advertisement
7/7
जोपर्यंत हे विमान रनवेवरून हटवले जात नाही, तोपर्यंत फुकेत विमानतळावरील सेवा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
133 प्रवाशांना वाटलं की सगळं संपलं, लॅण्डिंगदरम्यान चाक निखळलं, Air India च्या विमानासोबत कुठे झाला अपघात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल