TRENDING:

पावसाळ्यात या 5 भाज्या टाळा! अन्यथा तब्येत बिघडलीच म्हणून समजा

Last Updated:
पावसाळा सुरू झाला की अनेक आजारही डोकं वर काढतात. आपल्या खाण्यातून बऱ्याचदा इन्फेक्शन होण्याचा धोका या काळात अधिक असतो. त्यामुळे तळलेले पदार्थ आणि स्ट्रीट फूड शक्यतो टाळलंच पाहिजे, असं राजस्थानातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर श्री राम सांगतात. तसेच रोजच्या आहारातून 5 भाज्या शक्यतो टाळण्याचा सल्लाही ते देतात.
advertisement
1/5
पावसाळ्यात या 5 भाज्या टाळा! अन्यथा तब्येत बिघडलीच म्हणून समजा
पावसाळ्यात शक्यतो लोहयुक्त भाज्या खाणं टाळावं. पालकमुळं गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शनचा धोका असतो. पावसाळ्यात ही भाजी वात आणि पित्त दोष वाढवून कफ दोष कमी करते. त्यामुळे या काळात उत्तम आरोग्यासाठी शक्यतो पालक खाणं टाळलं पाहिजे, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
2/5
प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात वांग्याची भाजी केलीच जाते. परंतु, पावसाळ्यात वांगी किडण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे या काळात जास्त वांगी खाणं टाळलं पाहिजे. काही लोकांना तर वांग्यातील एल्कलॉइडमुळं एलर्जी होण्याचा धोकाही असतो. त्यामुळं अंगावर पित्त उठणं, खाज सुटणं, मळमळणं आणि त्वचेवर पुरळ उठणं यासारख्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
advertisement
3/5
पावसाळा म्हटलं की पकोडे खाण्याची इच्छा अनेकांना होते. पकोडे असो की पराठे त्यामध्ये वापरला जाणारा फ्लॉवर (फूल कोबी) सगळेजण आवडीनं खातात. परंतु, फ्लॉवरपासून बनवलेला कोणताही पदार्थ आपल्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकतो. यामुळे पचनसंस्था प्रभावित होऊन शरीरात वात दोष वाढू शकतो.
advertisement
4/5
सॅडल असो की फ्राइड आणि नूडल्स यामध्ये कोबी वापरला जातो. परंतु, पावसाळ्याच्या काळात कोबी आपल्या आरोग्यास हानीकारक ठरू शकतो. आहारातील समावेशामुळं जठराग्नी म्हणजेच पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो आहारात कोबी टाळावा, असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ देतात.
advertisement
5/5
स्टार्टर, नूडल्स आणि बहुतांश चायनिज पदार्थांत शिमला मिरची वापरली जाते. पावसाळ्यात मात्र ही फळभाजी फारशी उपयुक्त नाही. तिचं कच्चेपण आणि थंड प्रकृती पचनसंस्थेला त्रासदायक ठरू शकतो. पित्त होऊन वात आणि पित्त दोष वाढू शकतो. त्यामुळे <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/do-not-eat-these-vegetables-in-monsoon-know-in-detail-important-information-for-your-health-l18w-mhkd-1209415.html">पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी शक्यतो या 5 भाज्या टाळाव्यात</a>, असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ देतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
पावसाळ्यात या 5 भाज्या टाळा! अन्यथा तब्येत बिघडलीच म्हणून समजा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल