'माझं नाव घ्यायचं आणि...', राधा पाटीलसोबच्या वादावर स्पष्टच बोलली गौतमी, डान्सर्समधला वाद आता चव्हाट्यावर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gautami Patil vs Radha Patil: नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये गौतमी पाटीलने राधासोबतच्या वादावर जे भाष्य केलंय, त्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.
advertisement
1/7

मुंबई : महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यात सध्या लावणी आणि डान्सचा फिव्हर आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण या ग्लॅमरस दुनियेत दोन नावं सध्या एकमेकींसमोर शड्डू ठोकून उभी आहेत. एक म्हणजे गौतमी पाटील आणि दुसरी 'बिग बॉस' फेम राधा पाटील मुंबईकर.
advertisement
2/7
या दोघींच्या अदाकारीवर लाखो तरुण फिदा आहेत, पण पडद्यामागची यांची दुश्मनी आता चव्हाट्यावर आली आहे. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये गौतमीने राधासोबतच्या वादावर जे भाष्य केलंय, त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे.
advertisement
3/7
अभिजात मराठीच्या पॉडकास्टमध्ये गौतमीला जेव्हा विचारण्यात आलं की, "आम्ही ऐकलंय राधा पाटीलचं तुझ्यावर खूप प्रेम आहे?" त्यावर गौतमीने हसून उत्तर दिलं, "हो, खूपच जास्त प्रेम आहे तिचं माझ्यावर! असू दे, चांगली गोष्ट आहे. मी नेहमी सांगते, माझ्याबद्दल कोणी काहीही बोललं तरी मला फरक पडत नाही. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्याने सोडून द्यायचं, हाच माझा मंत्र आहे. शेवटी काय, आपलीच आहे ती!" गौतमीच्या या शांत पण दमदार उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
advertisement
4/7
राधा पाटीलने एका मुलाखतीत गौतमीवर गंभीर आरोप केले होते. राधाच्या मते, एका कार्यक्रमात गौतमीचा इगो हर्ट झाला होता. राधा म्हणाली होती, "एका शोमध्ये गौतमी ७ वाजता पोहोचली आणि मी माझ्या वेळेनुसार ८:३० ला आले. मी आल्यावर जेव्हा प्रेक्षकांनी जल्लोष केला आणि माझ्यासोबत फोटो काढायला गर्दी केली, तेव्हा गौतमीला राग आला. तिने आयोजकांना विचारलं की, 'कोणासोबत मला डान्स करायला लावताय? तिची लेव्हल काय आहे?' स्वतःला खूप सभ्य समजणाऱ्या गौतमीने तिथे माझा अपमान केला."
advertisement
5/7
बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करतानाही राधाने थेट आव्हान दिलं होतं की, ती कोणालाही घाबरत नाही, मग ती गौतमी पाटील का असेना!
advertisement
6/7
गौतमीने या वादावर स्पष्टपणे सांगितलं की, तिला स्वतःहून कोणाला उत्तर देण्याची गरज भासत नाही. ती म्हणाली, "लोकांना सवयच झालीये माझं नाव घेऊन काहीही बोलायची. पण मला बोलायची गरज पडत नाही, कारण माझे चाहते सोशल मीडियावर आधीच सगळ्यांना चोख उत्तरं देऊन मोकळे होतात. मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो."
advertisement
7/7
गौतमी पाटीलवर कितीही टीका झाली तरी तिची क्रेझ कमी झालेली नाही. दुसरीकडे राधा पाटीलने 'बिग बॉस'च्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोन डान्सिंग क्वीन्समधला हा कॅट फाईट आता कोणत्या थराला जाणार, हे पाहणं रंजक ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'माझं नाव घ्यायचं आणि...', राधा पाटीलसोबच्या वादावर स्पष्टच बोलली गौतमी, डान्सर्समधला वाद आता चव्हाट्यावर