TRENDING:

द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी कधी? या दिवशी चुकूनही करू नका 'हे' एक काम, घरात येईल गरिबी; व्हाल कंगाल!

Last Updated:
हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला 'द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी' म्हटले जाते. भगवान गणेशाच्या 32 रूपांपैकी सहावे रूप असलेल्या 'द्विजप्रिय' गणेशाची या दिवशी पूजा केली जाते.
advertisement
1/7
संकष्टी चतुर्थी कधी? या दिवशी चुकूनही करू नका 'हे' एक काम, घरात येईल गरिबी
हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला 'द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी' म्हटले जाते. भगवान गणेशाच्या 32 रूपांपैकी सहावे रूप असलेल्या 'द्विजप्रिय' गणेशाची या दिवशी पूजा केली जाते.
advertisement
2/7
यावर्षी ही चतुर्थी 5 फेब्रुवारी 2026, गुरुवार रोजी येत आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनातील सर्व विघ्न दूर होतात आणि आर्थिक भरभराट होते. मात्र, या दिवशी अनवधानाने केलेल्या काही चुकांमुळे बाप्पा कोपू शकतो आणि घरात दरिद्रता येऊ शकते.
advertisement
3/7
करू नका हे काम: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका आणि विशेषतः घराबाहेर आलेल्या कोणत्याही गरजूला रिकाम्या हाती पाठवू नका. तसेच, या दिवशी 'तुळशीचे पान' गणपतीला अर्पण करू नका. शास्त्रानुसार, तुळशीने गणेशाला शाप दिला होता, त्यामुळे गणपती बाप्पाला तुळस अर्पण केल्याने घरात अशांती आणि गरिबी येते, असे मानले जाते.
advertisement
4/7
गणपतीला दुर्वा अर्पण करा: बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. 21 दुर्वांची जुडी 'ॐ गं गणपतये नमः' म्हणत अर्पण केल्याने रखडलेली कामे मार्गी लागतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रोदयानंतरच पूर्ण होते. चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय जेवण केल्यास व्रताचे फळ मिळत नाही.
advertisement
5/7
तामसिक भोजन टाळा: या दिवशी विसरूनही मांस, मद्य किंवा कांदा-लसणाचे सेवन करू नका. असे केल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन गरिबी येते. उपवासाच्या दिवशी मन आणि शरीर शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. वादावादी किंवा भांडणांपासून लांब राहावे, अन्यथा घरात लक्ष्मी टिकत नाही.
advertisement
6/7
लाल वस्त्रांचा वापर: पूजेच्या वेळी लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. गणपतीला लाल फुले आणि मोदक अर्पण केल्याने घरात सुख-समृद्धी येते.
advertisement
7/7
परोपकार आणि दान: या दिवशी शक्य असल्यास गरिबांना गुळ किंवा तीळ दान करावे. गरिबांचा तळतळाट घेतल्याने व्यक्ती कंगाल होऊ शकते, त्यामुळे त्यांच्याशी आदराने वागावे. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/अध्यात्म/
द्विजप्रिय संकष्टी चतुर्थी कधी? या दिवशी चुकूनही करू नका 'हे' एक काम, घरात येईल गरिबी; व्हाल कंगाल!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल