TRENDING:

Tofu Or Paneer : टोफू की पनीर कशामध्ये आहे जास्त प्रोटीन? काय खाणे बेस्ट?

Last Updated:
पनीर आणि टोफू या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक आणि प्रोटीन असतं. पनीर हे दुधापासून तयार होतं आणि टोफू हा सोयाबीनच्या दुधापासून तयार होतो.
advertisement
1/7
Tofu Or Paneer  : टोफू की पनीर कशामध्ये आहे जास्त प्रोटीन? काय खाणे बेस्ट?
पनीर आणि टोफू हे दोन्ही खाणं आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणातून पोषक घटक आपल्या शरिराला मिळत असतात.
advertisement
2/7
पण टोफू की पनीर या दोन्हीपैकी काय खायचं? या दोन्हीपैकी काय खाल्ल्यामुळे आपल्याला जास्त पोषक घटक मिळतात? काय खाणं चांगलं आहे? याविषयीचं आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती सांगितलेली आहे.
advertisement
3/7
पनीर आणि टोफू या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक आणि प्रोटीन असतं. पनीर हे दुधापासून तयार होतं आणि टोफू हा सोयाबीनच्या दुधापासून तयार होतो. या दोन्हीमध्ये वेगवेगळे असे घटक आहेत. टोफूमधून भरपूर प्रमाणात आपल्या शरिराला प्रोटीन मिळतं.
advertisement
4/7
जर तुम्हाला पनीर खायचं असेल पण ते पनीर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे खाणं गरजेचं आहे कारण की सध्याला बाजारामध्ये भेसळयुक्त पनीर मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे तुम्ही पनीर हे चांगल्याच क्वालिटीचा खावा नाहीतर तुम्ही घरी देखील पनीर तयार करू शकता, असं आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर सांगतात.
advertisement
5/7
त्याचप्रमाणे टोफू देखील जर तुम्हाला खायचा असेल तर तो देखील तुम्ही अत्यंत चांगल्या क्वालिटीचा घेणे गरजेचे आहे. टोफू हा सोयाबीनपासून तयार केला जातो. टोफूमध्ये फॅटचं प्रमाण हे पनीरपेक्षा कमी असतं. पनीरपेक्षा जास्त प्रमाणात फायबर हे टोफूमध्ये असतं.
advertisement
6/7
ज्यांना प्रथिनांची कमतरता आहे ते सर्वजण आपल्या आहारामध्ये टोफूचा समावेश करू शकतात. कारण की टोफू हा सोयाबीन वरती प्रक्रिया करून तयार केला जातो. तसंच ज्या लोकांना दुधाची एलर्जी आहे अशी लोक पनीर ऐवजी टोफूचा समावेश आपल्या आहारात करू शकतात.
advertisement
7/7
पण तुम्ही टोफू आणि पनीर खाताना दोन्हीही प्रमाणामध्येच खावं. त्याचा अतिरेक हा करू नये कारण की जर तुम्ही याचा जास्त अतिरेक केला तर त्यामुळे त्याचे दुष्परिणाम देखील तुमच्या शरिरावर होऊ शकतात, असं आहार आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Tofu Or Paneer : टोफू की पनीर कशामध्ये आहे जास्त प्रोटीन? काय खाणे बेस्ट?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल