TRENDING:

घरातील बाल्कनीत किंवा अंगणात लावा हे झाड, डासांपासून होईल सुटका!

Last Updated:
Mosquito Repellent Plants : ऋतू बदलल्यावर मच्छरांची संख्या वाढते. सध्या दिवाळीनंतर अद्यापही हवी तशी थंडी पडायला सुरुवात झालेली नाही. मात्र, या काळात मच्छरांची संख्या वाढल्याचे दिसून येते. अशावेळी काही झाडे तुम्हाला मदत करू शकतात. ती कोणती, ते जाणून घेऊयात. (आतिश त्रिवेदी/लखिमपूर, प्रतिनिधी)
advertisement
1/5
घरातील बाल्कनीत किंवा अंगणात लावा हे झाड, डासांपासून होईल सुटका!
मच्छर चावल्याने डेंग्यू, मलेरिया यांसारखा आजार होतो. यामुळे व्यक्तिला मोठा फटका बसू शकतात. मच्छरांपासून सुटका मिळण्यासाठी मच्छर हटवणारे कॉइल आणि अन्य किटनाशकांचा वापर केला जातो. मात्र, तुम्ही तुमच्या घराजवळ काही झाडे लावून मच्छरांपासून दूर राहू शकतात.
advertisement
2/5
तुळशीचे झाड हे डासांपासून सुटका मिळवण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. आरोग्य चांगले ठेवण्यासोबतच घरातील डास दूर करण्यातही मदत होते. घरात डास येऊ नयेत, यासाठी तुम्ही घरामध्ये तुळशीचे रोप लावू शकता.
advertisement
3/5
रोझमेरी वनस्पतीचा सुगंध डासांना दूर ठेवतो. रोझमेरीची फुले पाण्यात भिजवून खोलीत फवारणी केली, तसेच घरामध्ये रोझमेरी जाळल्यानेही डास दूर राहतात. रोझमेरी रोपे घरामध्ये किंवा घराबाहेर लावली जाऊ शकतात.
advertisement
4/5
झेंडूच्या फुलांचा वासही डास आणि इतर कीटकांना दूर ठेवतो. यातून येणारा वास हा पायरेथ्रम, सॅपोनिन, स्कोपोलेटिन, कॅडिनॉल आणि इतर घटकांनी बनलेला असतो. यामुळे डास तुमच्या घरापासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे झेंडूची झाडे लावल्याने डासांच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.
advertisement
5/5
पुदिन्याच्या वासानेही डास पळून जातात. पुदिन्याचे रोप अर्धवट सूर्यप्रकाशात घरात किंवा बाहेर ठेवता येते. पुदिन्याची पाने कुस्करून त्वचेवर लावल्यानेही डास दूर राहतात. (सूचना : या बातमीमध्ये दिलेली माहिती ही तज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
घरातील बाल्कनीत किंवा अंगणात लावा हे झाड, डासांपासून होईल सुटका!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल