photos : लिव्हरला करते मजबूत, पाइल्सवरही रामबाण उपाय, शरीरासाठी या फळाचे खूपच फायदे
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
फळे ही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे मोसमी फळांचा आपल्या आहारात नक्की समावेश करावा. फळे खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते. अशाच एका फळाबाबत आणि त्याच्या फायद्यांबाबत आपण जाणून घेऊयात. (संजय यादव, प्रतिनिधी)
advertisement
1/7

पपई असे या फळाचे नाव आहे. पपई अनेकांना खायला आवडते. या फळाचे फायदेही खूप आहेत. यामुळे अनेक गंभीर आजारांपासून सुटका होऊ शकते. आयुर्वेदानुसार, यामध्ये अनेक पोषक तत्त्व आहेत. त्यामुळे हे फळ आरोग्याला फायदेशीर आहे.
advertisement
2/7
जिल्हा रुगालय बाराबंकी येथील डॉक्टर डॉ. अमित वर्मा (एमडी मेडिसिन) यांनी सांगितले की पपईचे फळ, बिया हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स, अँटीऑक्सिडंट्स आणि अमिनो ॲसिड्स मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे अनेक गंभीर आजारांपासून आपले संरक्षण होते.
advertisement
3/7
एखाद्या औषधाची ऍलर्जी, कोणत्याही रोगाचा दुष्परिणाम किंवा शरीरात कोणत्याही जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे तोंडावर व्रण किंवा जखमा निर्माण होतात. अशावेळी पपई खाल्ल्याने खूप फायदा होतो. याशिवाय पपईचे दूध जिभेवर लावल्याने जिभेवरील जखमा लवकर बऱ्या होतात.
advertisement
4/7
त्वचेची समस्या जसे की, खाज किंवा चेहऱ्यावर डाग असतील तर पपईच्या बिया बारीक करून त्यात ग्लिसरीन मिसळून यावर लावल्यास त्याचा फायदा होतो. याशिवाय याच्या फळांचा रस लावल्यानेही या समस्या कमी होतात.
advertisement
5/7
दातदुखी तसेच मूळव्याधच्या समस्येवर पपई खूप फायदेशीर आहे. कच्च्या पपईपासून काढलेले दूध मूळव्याधात लावल्यास फायदा होतो. तसेच दात दुखत असतील तर कच्च्या पपईचे दूध कापसात गुंडाळून दातावर लावल्याने हा त्रास बऱ्याच प्रमाणात बरा होतो.
advertisement
6/7
यकृताची समस्या असेल, भूक कमी लागत असेल त्यावेळी तुम्ही पपईच्या बियांना रोज रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने यकृत मजबूत होते आणि भूक वाढते.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्यविषयक सल्ले तज्ञांशी झालेल्या संवादावर आधारित आहेत. ही सामान्य सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरावी. कोणत्याही हानीसाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
photos : लिव्हरला करते मजबूत, पाइल्सवरही रामबाण उपाय, शरीरासाठी या फळाचे खूपच फायदे