TRENDING:

उन्हाळ्यात केसाच्या समस्यांचं टेन्शन सोडा, कोरफडीचा हा रामबाण उपाय ट्राय करा

Last Updated:
उन्हाळ्यात केसांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या वाढीसाठी कोरफडीचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करता येतो.
advertisement
1/7
उन्हाळ्यात केसाच्या समस्यांचं टेन्शन सोडा, कोरफडीचा हा रामबाण उपाय ट्राय करा
उन्हाळा सुरू झाला की उष्णतेचा त्रास आणि इतर आजारांचा सामना करावा लागतो. त्यासाठी अनेकजण आयुर्वेदिक उपयारांचा पर्याय निवडतात. उन्हाळ्यात केसांच्या संबंधित विविध समस्या निर्माण होतात. त्या टाळण्यासाठी कोरफड हा एक उत्तम उपाय आहे. केसांना मजबूत बनवून वाढीस चालना देण्याचं काम कोरफड करते. याबाबत <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील ब्यूटीशियन धनश्री भांडेकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
2/7
उन्हाळ्यात केसांमध्ये स्काल्पवर घामोळ्या होणे, उष्णतेमुळे होणाऱ्या समस्या, यावर आराम मिळविण्यासाठी कुठेही अगदी सहज उपलब्ध होणारी कोरफड फायदेशीर ठरू शकते. कोरफडीचा आपल्या केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो.
advertisement
3/7
कोरफडीचा एक पान घ्यायचं आणि त्यातील पूर्ण गर काढून घ्यायचा. हा गर डायरेक्ट स्कॅल्पवर आणि केसांवर लावू शकता. तसेच पॅकच्या स्वरूपात लावू शकता.
advertisement
4/7
पॅक लावायचा असल्यास कोरफडीचा गर आणि त्यात कडुनिंबाच्या पानांची पेस्ट, थोडे दही, 2 थेंब लिंबू रस असे एकत्र करून घ्यायचे. केसांना मेहंदी लावतात त्याप्रमाणे पूर्ण स्काल्प आणि केसांना लावून घ्यायचे. हा पॅक 10 ते 15 मिनिटे ठेवा आणि सौम्य शाम्पूने धुवून घ्या.
advertisement
5/7
कोरफडीचा गर आणि त्यात कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल ऍड करून थोडं कोमट करायचं. त्याचा केसांच्या मुळाशी मसाज करावा. शक्यतो हा उपाय रात्री झोपताना केल्यास त्याचा चांगला फायदा दिसून येऊ शकतो. कारण रात्री बॉडी रिलॅक्स असते आणि डोकंही शांत असतं. चांगली झोप होते त्यामुळ मसाज जास्त फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
6/7
हा मसाज केल्यानंतर टर्कीश टॉवेल गरमपाण्यात बुडवून त्याला पिळून घेऊन केसांना गुंडाळून ठेवायचा. म्हणजे त्या टॉवेलने केसांना वाफ द्यायची आहे. असे केल्याने केसांची वाढ चांगली होईल आणि केसात फंगल इन्फेक्शन असेल तर तेही दूर होण्यास मदत होईल, असे भांडेकर सांगतात.
advertisement
7/7
दरम्यान, कोरफडीच्या वापरामुळे फंगल इन्फेक्शन, घामोळी किंवा घामापासून होणाऱ्या समस्या आणि उवा सुद्धा निघून जातत. केसांना भरपूर फायदा होतो. केसांची वाढ होते. केस चमकदार आणि मुलायम होतात, असेही ब्यूटीशियन धनश्री भांडेकर यांनी सांगितले.(अमिता शिंदे, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात केसाच्या समस्यांचं टेन्शन सोडा, कोरफडीचा हा रामबाण उपाय ट्राय करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल