वजन कमी करण्याचा नवा फंडा, लगेच सुरू करा म्यूझिक योगा
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
आपण वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले असतील. पण डान्सिंग योगा किंवा म्यूझिक योगा ट्राय केलाय का?
advertisement
1/7

आपल्याकडे वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. वेगवेगळे व्यायाम आणि आहार पद्धती अवलंबल्या जातात. यात आणखी एक भर पडली असून अनेकजण वजन कमी करण्यासाठी म्युझिक योगा करत आहेत. म्युझिक योगा म्हणजे इन्स्ट्रुमेंटल गाण्यांवर ठेका धरून संपूर्ण शरीराचा व्यायाम करणे होय.
advertisement
2/7
<a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील म्युझिक योगा प्रशिक्षक निकिता बुरांडे म्यूझिक योगाचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. त्याचा अनेकांना लाभही झाला आहे. म्यूझिक योगामध्ये झुंबा पद्धतीचाही वापर केला जातो. झुंबा पद्धतीतील काही स्टेप्स यात केल्या जातात. योगा हा हसत खेळत देखील केला जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
advertisement
3/7
डान्स योगा किंवा म्युझिक योगाचा शरीरासाठी चांगला फायदा होतो. प्रशिक्षक निकिता या डान्स योगाचा त्यांना स्वतःला झालेला फायदा देखील सांगतात. त्यामुळे मोठ्या संख्येने वर्धेकर वजन कमी करण्यासाठी पहाटे साडेपाच ते सात वाजेपर्यंत मोठया उत्साहात प्रात्यक्षिके करताना दिसून येत आहेत.
advertisement
4/7
डान्सिंग योगा किंवा म्युझिक योगाच्या माध्यमातून शरीराला फायदा होतो. योगा नृत्यामुळे थायरॉईड, ब्लड प्रेशर, वजन वाढलेले कमी करणे किंवा पॅरेलेसिस, हातपाय दुखणे अशा प्रकारच्या अनेक शारीरिक समस्यांवर आराम मिळतो, असे प्रशिक्षक बुरांडे सांगतात.
advertisement
5/7
योगाच्या माध्यमातून सर्वांनी शारीरिक आणि मानसिक रित्या स्वस्थ राहण्याची गरज आहे. त्यासाठी वर्ध्याच्या आयटीआय टेकडीच्या परिसरात म्युझिक योगा प्रशिक्षक निकिता बुरांडे या मार्गदर्शन करत आहेत. वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी बघायला मिळतोय.
advertisement
6/7
महिलांसह पुरुष वर्ग देखील वजन कमी करण्यासाठी म्युझिक योगासाठी हजेरी लावतोय. झुम्बा स्टेप्स करून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे हळूहळू वर्धेकरांची संख्या याठिकाणी वाढताना दिसतेय.
advertisement
7/7
नागरिकांना झुंबा किंवा योगा नृत्य करण्याचे फायदे कळल्यानंतर प्रत्येक जण या स्टेप्स आणि शरीरासाठी होणारे योगाचे फायदे समजून घेत आहे. जेणेकरून आपल्या निरोगी आयुष्यासाठी त्याचा फायदा होईल. त्यामुळे आपणही निरोगी आरोग्यासाठी हा डान्सिंग योगा नक्की ट्राय करू शकता.