Jaswand Cha : जास्वंदाच्या फुलाचे आरोग्यासाठी फायदे, चहा करून प्याल तर हे आजार राहतील कायमचे दूर
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
जास्वंदाच्या फुलाला धार्मिक असे खूप महत्त्व आहे. तसेच जास्वंदाच्या फुलाचे आपल्या आरोग्यासाठी देखील खूप असे फायदे होतात.
advertisement
1/7

जास्वंदाच्या फुलाला धार्मिक असे खूप महत्त्व आहे. तसेच जास्वंदाच्या फुलाचे आपल्या आरोग्यासाठी देखील खूप असे फायदे होतात. कारण की याला आयुर्वेदामध्ये देखील खूप महत्त्व आहे.
advertisement
2/7
तसेच जास्वंदाच्या फुलाचा आपण चहा जर करून दिला तर त्याचे देखील भरपूर अशी फायदे आपल्या शरिराला होत असतात. त्यासोबतच अनेक अशा आजारांवरती देखील हे फायदेशीर आहे. तर याचे काय फायदे होतात किंवा आपण कशा पद्धतीने हा चहा तयार करू शकतो? याविषयीचं माहिती आपल्याला आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
जास्वंदाच्या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट घटक असतात. ज्यांना मोठ्या प्रमाणात सांधेदुखी होते अशांवरती हा चहा अत्यंत असा गुणकारी आहे.
advertisement
4/7
यामध्ये कमी कॅलरीज असतात. ज्यांना कॅफिनसाठी ऑप्शन हवे आहेत त्यांच्यासाठी हा चहा अत्यंत असा गुणकारी ठरू शकतो किंवा फायदेशीर ठरू शकतो.
advertisement
5/7
त्याचप्रमाणे जास्वंदाचा चहा हा बीपी नियंत्रणात ठेवायला मदत करतो. कोलेस्ट्रॉल कमी करायला देखील मदत करतो आणि ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा चहा खूप फायदेशीर ठरेल. जर जास्वंदाच्या फुलाचा चहा आपण घेतला तर पचन देखील चांगले होतं. तसेच यामुळे भूक देखील कमी लागते, असं आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे सांगतात.
advertisement
6/7
तसेच लिव्हरचे आरोग्य देखील हा चहा चांगला ठेवतो त्यामुळे तुम्ही हा चहा घेऊ शकता. सध्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँडचे चहा उपलब्ध आहेत. तुम्ही कुठलाही चहा घेऊ शकता. हा चहा करताना तुम्ही एक कप चहा करत असाल तर त्यामध्ये तुम्ही एक टी स्पून जास्वंदाचा चहाची पावडर टाकायची आणि उकळून घ्यायचा.
advertisement
7/7
तुम्ही तो साखर न टाकताच घ्यावा जेणेकरून त्याचे जास्त फायदे तुम्हाला मिळतील. तुम्ही जे जास्वंदाची फुलं आहेत ती फुलं वाळवत घालायची आणि त्यानंतर त्याची पावडर करून जरी तुम्ही त्याचा चहा बनवला तरी देखील चालते. तर अशा पद्धतीने तुम्ही हा चहा घेऊ शकता आणि याचे फायदे मिळू शकतात, असंही आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Jaswand Cha : जास्वंदाच्या फुलाचे आरोग्यासाठी फायदे, चहा करून प्याल तर हे आजार राहतील कायमचे दूर